Skin Scrub : तुम्ही दररोज स्क्रब करता? जाणून घ्या स्क्रब करण्याचे फायदे-तोटे | पुढारी

Skin Scrub : तुम्ही दररोज स्क्रब करता? जाणून घ्या स्क्रब करण्याचे फायदे-तोटे

Skin Scrub : चेहऱ्याची त्वचा नाजूक असते. त्यामुळे तिची काळजीदेखील तेवढ्याच नाजूकपणे घेतली गेली पाहिजे. ज्यांच्या त्वचेतून तेलाचा स्राव जास्त येत असेल त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, हा स्राव जास्त होत राहिला तर तैलग्रंथीच्या तोंडापाशी तेल गोठते आणि त्याचे तोंड बंद होते. त्यामुळे व्हाईट हेडस् आणि काही दिवसांनी ब्लॅक हेडस दिसू लागतात. अशा परिस्थितीत डीप क्लिंझिंगचा उपयोग खूप फायद्याचा ठरतो. जास्त स्निग्धता नसलेले लोशन किंवा जेल यांच्या मदतीने ओल्या कापसाने चेहरा आणि मान पुसून काढावी.

आठवड्यातून एकदा वाफ घेऊन स्वच्छ मक टॉवेलने व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड हळूच दाबून बाहेर काढावे. अॅलोवेरा जेलमध्ये चंदन पावडर मिसळून त्याचा पॅक लावावा. यामुळे त्वचेतील अनावश्यक सिवम शोषले जाते. टोनर म्हणून गुलाब पाण्याचा वापर करता येतो. यामुळे त्वचा तजेलदार दिसते.

Skin Scrub : आठवडयातून एकदा किंवा पंधरा दिवसांतून स्क्रब करा

आठवडयातून एकदा किंवा पंधरा दिवसांतून स्क्रबचा वापर करावा. रोज स्क्रब वापरू नये. कारण त्वचा नाजूक असल्याने रोज खडबडीत पदार्थांनी स्क्रब करणे त्रासदायक ठरू शकते. त्वचेवरील पेशींचे नूतनीकरण पंचवीस ते तीस दिवसांनी होत असते. त्यामुळे रोजच स्क्रब करणे हानिकारकच असते. त्वचा तेलकट असल्यास क्रिमवेस स्क्रब वापरू नये. जेलबेस स्क्रब वापरावा.

पारंपरिक उटणे दुधात भिजवून ते म्हणून वापरणे उत्तम ठरते. जीवाणूंचा प्रादुर्भाव झाल्यास चेहऱ्यावर लाल- पिवळे ठिपके असलेल्या तारुण्यपिटिका दिसू लागतात. या पिटिका फोडू नयेत. दर दोन-तीन तासांनी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. त्रिफळा चूर्ण किंवा जेलबेस फेसवॉशने चेहरा धुवावा. संसर्ग असताना स्क्रब चेहऱ्याला लावू नये. कुठल्याही जाहिरातीना भुलून सौंदर्यप्रसाधने वापरू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे वापरावीत. (सौंदर्यं)

हेही वाचा : 

Back to top button