शेंगदाणे साठवणार आहात ? 'या' टीप्‍स करतील मदत | पुढारी

शेंगदाणे साठवणार आहात ? 'या' टीप्‍स करतील मदत

किराणा सामान आणल्यावर त्याची योग्य साठवणूक महत्त्वाची असते. सामानामध्ये शेंगदाणे हा घटक हमखास असतो. उपवासाच्या पदार्थामध्ये त्याचे कूट आवर्जुन वापरले जाते. बदाम, काजू वेलदोडे यांची साठवणूक योग्य प्रकारे करणे आवश्यक असते, विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांची साठवणूक करताना योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागते.

‘या’ टीप्‍स ठरतील फायदेशीर

  •  सर्वप्रथम बंद पाकिटातून आणलेले हे घटक चांगले आहेत ना ते पाहून घ्या. लगेचच वापरणार नसाल तर ते ताबडतोब स्वच्छ आणि कोरड्या कंटेनरमध्ये घालून फ्रिज किंवा फ्रिजरमध्ये साठवून ठेवा. यासाठी घट्ट झाकणाचे प्लास्टिकचे डबेही यासाठी योग्य ठरतील.
  • सालीसकटचे दाणे आणि दाण्याच्या कुटापासून बनवलेल्या पदाथाची साठवणूक करताना त्या थंड असल्या पाहिजेत. कमी तापमानात शेगदाणे अधिक टिकतात. आपल्या फ्रिजमध्ये चार-पाच महिनेसुद्धा आरामात शेंगदाने टिकवता येतात; पण शून्य अंश सेल्सिअस तापमानात फ्रिज किंवा फ्रिजरमध्ये ते वर्षभर टिकू शकतात. टरफलासहित असलेले शंगदाणे कोणत्याही तापमानाला यापेक्षा अधिक टिकू शकतात. आतल्या गराचे तुकडे करूनही दाणे साठवता येतात.
  • कच्च्या दाण्यांप्रमाणेच भाजलेले दाणेसुद्धा फ्रिजरमध्ये ठेवता येतात. जेव्हा आपल्याला त्यातील वापरायचे असतील तेव्हा डबा किंवा बारणी फ्रिजमधून बाहेर काढून ठेवावी. सर्वसाधारण तापमानाला आल्यानंतरच त्याचा वापर करावा. शेंगदाणे बाहेर हवेत काढून ठेवले, तर ते सादळतात आणि मऊ पडतात. त्यामुळे लागेल तेवढे घेऊन बरणी पुन्हा झाकण घट्ट लावून फ्रिजमध्ये ठेवावी, तरीही हवेच्या संपर्कात आल्यावर ते सादळले तर १५० अंश तापमानावर ओव्हनमध्ये घालून ते पंधरा-वीस मिनिटे गरम करावेत.
-रया सुरेंद्र

Back to top button