सामान्य आणि तेलकट त्वचा

तारुण्यामध्ये तैलग्रंथी जास्त प्रमाणात तेल तयार करतात. वय वाढले की त्याचे प्रमाण कमी होत जाते. गरोदरपणात आणि रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्सच्या बदलांमुळे तैलग्रंथी तेल जास्त प्रमाणात तयार करतात.
सामान्य त्वचा
या प्रकारची त्वचा मऊ, मुलायम, एकसंध पोत असलेली आणि नितळ असते. मासिक पाळी येण्यापूर्वी हार्मोन्सची पातळी वाढल्यामुळे त्वचेतील तैलग्रंथी जास्त सक्रिय होतात. म्हणून चेहर्यावर एक-दोन पुटकुळ्या दिसतात. परंतु, पुटकुळ्यांचा त्रास या त्वचेच्या व्यक्तींना कधीच होत नाही. ही त्वचा तेलकट किंवा कोरडी नसते. ही त्वचा सुंदर असते. दुर्लक्ष केलेतर सुरकुत्या पडतात. अशी त्वचा रोज साबण लावून साफ करावी व नंतर चेहर्यावर गुलाबपाणी लावावे.
तेलकट त्वचा
अशा प्रकारच्या त्वचेला तेलकट चमक असते. ही जाड आणि गढूळ वर्णाची असते. त्चचेमधील तैलग्रंथी वाजवीपेक्षा जास्त तेल तयार करतात म्हणून ही त्वचा तेलकट दिसते. तैलग्रंथीची मुखे मोठी असतात, म्हणून त्वचा जाडीभरडी दिसते.
आपल्या चेहर्यावरील कपाळ, नाक आणि हनुवटी यांनी मिळून तयार होणारा भाग हा चेहर्यावरील इतर भागांपेक्षा जास्त तेली होतो. या भागावर घाम जास्त येत असतो. ज्यांची त्वचा तेलकट असते त्याचे हे अवयव नेहमी तेलकट दिसतात. तेलकट त्वचेची काळजी घेताना गरम पाण्याने आणि साबणाने त्वचा धुवावी म्हणजे तैलग्रंथाीची मुखे बंद होणार नाहीत. तारुण्यामध्ये तैलग्रंथी जास्त प्रमाणात तेल तयार करतात. वय वाढले की त्याचे प्रमाण कमी होत जाते. गरोदरपणात आणि रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्सच्या बदलांमुळे तैलग्रंथी तेल जास्त प्रमाणात तयार करतात. अशा प्रकारच्या त्वचेमुळे चेहर्यावर काळे डाग निर्माण होण्याची शक्यता असते.
– वर्षा शुक्ल (सौंदर्य)