Summer Hair Care : उन्हाळ्यातील केसांची काळजी | पुढारी

Summer Hair Care : उन्हाळ्यातील केसांची काळजी

कडक उन्हाचा वर्षाव व्हायला लागला की आपल्या स्कीनपासून ते केसांपर्यंत त्याचे विपरीत परिणाम जाणवू लागतात. पण शक्य तेवढी काळजी घेतल्यास उन्हाळा सुसह्य होऊन जाईल.

आज प्रत्येकाला करिअर, शिक्षण, नोकरी या निमित्ताने उन्हात, पावसात आणि थंडीत असे रिन्ही ऋतूंत बाहेर जावेच लागते. उन्हात बाहेर जाणे गरजेचे असेल तर सन स्कीन लोशन लावून बाहेर पडायला पाहिजे. शक्य असल्यास छत्रीचा वापर करावा. ऊन आणि प्रदूषणामुळे केसांचे आरोग्य फारच खराब होते. म्हणून केसांना स्कार्फ, रूमाल बांधूनच उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर पडणे आवश्कच.

केसांसे सौंदर्य वाढविण्यासाठी नेहमीच स्त्रिया दक्ष असतात. कितीही काळजी घेतली तरी ती त्यांना कमीच वाटते. केसांचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी प्रत्येक 15 दिवसांनी मेंदी लावायला पाहिजे. मेंदीकंडिशनरचे काम करेल. त्याशिवाय आठवड्यातून किमान एकदा अंडे आणि दह्याचा वापर केला पाहिजे.

बेसन, लिंबाचा रस आणि दही या तिघांना सम मात्रेत घेऊन केसांचे मसाज करून डोके धुवायला पाहिजे. सर्वात शेवटी केसांना लिंबाच्या पाण्याने फाइनल रिंस करावे. 1 वाटी मेंदीत आवळा, शिकेकाई, रिठा, मेथी, कडुलिंब, तुळशीचे पानं सर्वांना 1्र1 चमचा घेऊन दह्यात मिसळावे, त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून केसांना लावून 1 तास तसेच राहू द्यावे, याने केस मजबूत होतील व केसांना चमक येईल. थोडं गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्या पाण्याने केसांना धुऊन टाकावे. कोरड्या केसांमध्ये वेगळीच चमक येऊन ते मऊ होतील. (निगा)

Back to top button