मायक्रोवेव्ह वापरताय? | पुढारी

मायक्रोवेव्ह वापरताय?

योग्य माहितींच्या अभावामुळे मायक्रोवेव्हचा उपयोग फक्त अन्न गरम करण्यापुरताच केला जातो. काही जणांचा तसा गैरसमजही असतो; पण मायक्रोवेव्हचे अनेक उपयोग आहेत. मायक्रोवेव्हमध्ये साधारणपे अ‍ॅल्युमिनियम, प्लास्टिक, स्टील व सोनेरी सिल्व्हर लाईनवाल्या भांड्याचा वापर टाळा. या भांड्यांचा उपयोग केला तर भांडे वाकडे होण्याची दाट शक्यता असते. मायक्रोवेव्ह खराब होऊ शकतो. विशेष प्रकारची काचेची भांडी मायक्रोवेव्हप्रूफ असल्यामुळे त्यांचा उपयोग करावा.

मायक्रोवेव्हमध्ये तापमान सेंटीग्रेडमध्ये दिलेले असते. ते 900 सेंटीग्रेडपर्यंत असते. 900 सर्वोच्च, 700 उच्च, 450 मध्यम आणि 300 ते 180 कमी अशी त्याची श्रेणी आहे. तुम्हाला एखाद्या रेसिपीसाठी सर्वोच्च तापमानातून वजा 50 तापमान करायचे असेल तर सर्वोच्च 850 सेंटीग्रेडला पदार्थ शिजवायला पाहिजे. काही मायक्रोवेव्हमध्ये तापमान फॅरनेहाईटमध्ये दिलेले असते. त्यात सर्वाधिक तापमान 100 डिग्री, 80 डिग्री उच्च, 60 डिग्री मध्यम, 40 ते 20 डिग्रीचे कमी अशी श्रेणी असते.

कसे शिजवाल

250 ग्रॅम हिरव्या भाज्यांना पाणी न टाकता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे मायक्रो करावे. भाज्यांचे प्रमाण दुप्पट असेल तर वेळ दुप्पट करण्याऐवजी दिलेल्या वेळात 1 मिनिट जोडून द्यावे.

4 बटाट्यांना एका पॉलिथिनमध्ये ठेवून त्यात दोन तीन छिद्र करून 1 चमचा पाणी घालून 5 मिनिटे मायक्रो करावे. बटाटे, गाजर, रताळी, बीन्ससारख्या भाज्यांना नेहमी स्टँडिंग वेळ द्यावा.
– अंजली महाजन ( किचन )

Back to top button