ट्रेंड फीदर इअररिंग्जचा | पुढारी

ट्रेंड फीदर इअररिंग्जचा

हल्ली पिसांचे कानातले किंवा फीदर इअररिंग्जची चलती आहे. पार्टीला जाताना महाविद्यालयीन युवती या कानातल्यांना पसंती देताना दिसतात. हलके आणि सुंदर इअररिंग्ज खूप स्टायलिश दिसतात. त्यात विविध प्रकार आणि आकार आहेत. या लेटेस्ट ट्रेंड विषयी जाणून घेऊया….

पेहरावाला साजेसे पूरक कानातले असतील तर व्यक्तिमत्त्व नक्कीच चांगले दिसते. अनेकदा कानातले खूप जडशीळ असतात की ते खूपवेळ घालणे त्रासदायक ठरते. हल्ली अगदी हलक्या पण सुंदर कानातल्यांचा ट्रेंड आलेला पाहायला मिळतो तो म्हणजे फीदर इअररिंग्ज. तरीही हे वापरताना आकार आणि रंगाकडे जरूर लक्ष द्यावे.

मोरपंख किंवा पीकॉक फीदर

या कानातल्यांची नक्षी ही मोरपिसांसारखी असते. पीकॉक फीदर कानातले जीन्स टॉप, स्कर्ट, सलवार कुडता यांच्याबरोबर वापरू शकता. विविध आकारात आणि किंमतींमध्ये हे उपलब्ध असते. पीकॉक फीदर इअररिंग्जची लांबी जास्त म्हणजे खांद्यापर्यंत असते. त्यामुळे चेहरा वेगळा दिसतो.

टॉप्स फीटर

पाश्चिमात्य लूक आवडत असेल तर काळ्या रंगातील मेटल टॉप्स बरोबर फिक्स फीदर असलेले कानातले वापरू शकता. त्यामुळे सिनेअभिनेत्रींसारखा लूक मिळू शकतो. हल्ली अभिनेत्री कॉकटेल ड्रेसबरोबर ठळक रंगातील फिदर इअररिंग्ज वापरताना दिसतात. यामध्ये भरपूर रंग मिळतात. पोशाखाच्या रंगाबरहुकूम कानातले वापरता येतील.

बीडस फीदर

यामध्ये मोती आणि पंख यांनी कानातले सजवतात. तरीही ते खिशाला परवडण्याजोगे असतात. महाविद्यालयीन मुली, नोकरीला जाणाऱ्या महिला, पाश्चिमात्य किंवा पारंपरिक पोशाखावर हे कानातले घालू शकतात.

टेसल्स फीदर

फीदर इअररिंग्जचा हा नवा पॅटर्न आहे. महाविद्यालयीन युवतींमध्ये हा प्रकार चांगलाच प्रसिद्ध आहे. हे पक्ष्यांच्या पंखासारखे दिसतात. पण ते कृत्रिम असतात. विविध रंगांमध्ये हे मिळतात. टेसल्स फिदर कानातले मोकळे केस, ब्रेड, पोनी सारख्या हेअरस्टाईल वर घालू शकता.

ड्रीमकॅचर

यामध्ये भौमितिक आकारातील फिदर कानातले असतात. विविध रंग, वजनाला हलके कानातले खूप आकर्षक लूक देतात. कोणत्याही ड्रेस बरोबर हे कानातले घालू शकता. लांब सोनेरी चेन, पंख आणि पांढऱ्या टसल्स पासून हे इअररिंग्ज तयार केले जातात. आधुनिक पेहरावावर ते उठून दिसतात.

Back to top button