पाककृती : भाज्यांचे नूडल्स | पुढारी

पाककृती : भाज्यांचे नूडल्स

साहित्य
२५० ग्रॅम नूडल्स, ५० ग्रॅम कोबी, २५ ग्रॅम गाजर, दोन सिमला मिरच्या, २५ ग्रॅम फरसबीन, २५ ग्रॅम कांदा पात, आठ-दहा लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, चिली सॉस, सोया सॉस, मिरपूड, टोमॅटो सॉस, तेल.

कृती

सर्वप्रथम नूडल्स पाण्यात उकडावे. उकडताना पाण्यात एक चमचा तेल घालावे. त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटत नाहीत. नूडल्स शिजल्यानंतर चाळणीत गाळून टेबलावर थंड होण्यासाठी पसरावे. तेल घालून मिक्स करावे.

संबंधित बातम्या

कोबी, गाजर, सिमला मिरच्या, फरसबीन, कांदा पात पातळ लांबट कापून घ्यावे. एका कढईत तेल घालून गरम करून त्यात लसूण, कापलेल्या भाज्या घालून परतावे. चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, मिरेपूड, मीठ मिक्स करून नूडल्स घालून हलवावे. चवदार हक्का नूडल्स तयार होईल.

Back to top button