नारळ पाणी : सौंदर्यवर्धनासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त | पुढारी

नारळ पाणी : सौंदर्यवर्धनासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त

नारळ पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवड्यातून दोन-तीनवेळा नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाचा रंग उजळतो. ओले तसेच सुखे खोबरे शांती देणारे, कामशक्ती वाढवणारे, पोट साफ होण्यास मदत करणारे; अर्थात बद्धकोष्टाचा नाश करणारे आहे. शिवाय, टॉनिक म्हणूनही उपयुक्त आहे. त्वचेचे आरोग्य त्यामुळे सुधारते.

केस तसेच सौंदर्यवर्धनासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी साधारणत: एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळून लावावे. यामुळे केस मुलायम तर होतातच; शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होते आणि केसांची वाढ व्हायला लागते.

निस्तेज आणि कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळुवार हाताने मसाज करावा. नारळाचे पाणी व दूध त्वचेच्या क्लिझिंगसाठीही उपयुक्त ठरतात. कोरड्या आणि काळवंडलेल्या निस्तेज चेहऱ्याला मसाज करा. यामुळे त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत आणि तेजस्वी दिसू लागते. फेशियल मसाज करताना नारळाचे दूध क्रीममध्ये मिसळून वापरावे. असे केल्याने त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी होते. कोरड्या त्वचेला नारळाच्या तेलाने मसाज करावा.

-विधिषा देशपांडे

Back to top button