कस्तुरी सभासदांनी ‘एक हसीन सफर’ची मजा लुटली

सांगली : प्रतिनिधी

नववर्षाचे स्वागताला गुलाबी थंडीच्या वातावरणात 'एक हसीन सफर'च्या कलाकारांनी एकापेक्षा एक हिंदी, मराठी सिनेगीतांचा नजराणा सादर केला. कस्तुरी सभासदांनी लावणीपासून प्रेमगीतापर्यंत, अन् 'बदन पे सीतारे' पासून 'याड लागलं' गाण्यापर्यंतची मजा लुटली.

दै. 'पुढारी' कस्तुरी क्लबतर्फे अरविंद देवपूजा व जी. ई. लॉजिस्टीक प्रायोजित अलीजाफर प्रस्तुत 'एफ हसीन सफर' हिंदी – मराठी गाण्यांचा कार्यक्रम विष्णुदास भावे नाट्यमंदिरात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर सांगलीच्या गणेशाला वंदन करण्यासाठी अलीजाफर यांनी 'एक दंताय' या गीताने सुरुवात केली आणि सभागृह भारावून गेले. त्यानंतर बादशाहो या चित्रपटातील 'मेरे लश्के कमर' या सभासदांच्या आवडीच्या गीताला चांगलीच दाद मिळाली. 'खंडेराया झाली माझी दैना' या मराठी गीतानंतर 'अधीर मन झाले' हे गीत सादर करण्यात आले. 

'आवाज वाढीव डीजे' आणि सैराटमधील झिंगाट गाण्यावर महिला सभासदांनीही ताल धरला. 'अप्सरा आली', 'मला लागली कुणाची उचकी' या गाण्यावर कोमल कांबळे हिने लावणी नृत्य सादर केले. 

गुरुदत्त पाटणकर यांनी 'याड लागलं' हे गाणे सादर करून सभागृह भारावून टाकले. मो. युसूफ यांनी 'बदन पे सीतारे' या गाणे सादर करून सर्वांना शम्मी कपूरच्या जमान्यात नेले. वर्षा मंत्री यांनी देवता या चित्रपटातील 'ढोेलकीच्या तालावर' या गीतावर ठेका धरायला लावला. 

तब्बल तीन तास सुरू असलेल्या चित्रपटगीतांमध्ये कस्तुरीच्या सभासद रममाण झाल्या होत्या. साऊंडची जबाबदारी अनिकेत पाटील यांनी सांभाळली. या सर्व कार्यक्रमांना सुत्रामध्ये गुंफण्याचे काम जयश्री जाधव यांनी केले. कस्तरी क्लबच्या संयोजिका तनीम अत्तार यांनी आभार मानले. वाढदिवस असणार्‍या व सभासदांमधून उत्तम नृत्य करणार्‍यांना सौभाग्य कॉस्मेटिकडून बक्षिसे देण्यात आली. फनिगेम्सचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी सहभाग घेतला. विजेत्या महिलांना अरविंद देवपूजा यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर देण्यात आले. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news