अर्थभानाला द्या नियोजनाची जोड | पुढारी | पुढारी

अर्थभानाला द्या नियोजनाची जोड | पुढारी

राजकारणात कार्यरत असलेली महिला, उद्योगपती किंवा  बँकेतील मॅनेजर असो प्रत्येकीला नोकरी सांभाळत आर्थिक व्यवहार सांभाळावेच लागतात. आकडेवारीची व्याप्ती कमी जास्त असली तरी व्यवहारकुशलता त्यातून दिसून यायलाच हवी.  आज गृहिणीला ऑफिसमधील सर्व मॅनेजमेंट बघत बघत घरातील जबाबदार्‍याही पार पाडाव्या लागतात. त्यात पती जर परदेशात असेल तर मुलांचे स्कूल, कॉलेज, ट्युशन असे खर्च पाहवे लागतात. स्वत: एकटीने हा गाडा हाकावा लागतो. नोकरचाकर जरी मदतीला असतील तरी खर्चाची तडजोड ही तिलाच करावी लागते.  अर्थखात्याकडेही वळत खर्चाची योग्य सांगड घालावी लागते. 

स्वयंपाक घरातील छोट्या मोठ्या युक्त्या असोत, खरेदीतील चाणाक्षपणा किंवा चोखंदळपणा असो किंवा प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार असो यासाठी प्रत्येकीची जागरूकतेची धडपड असते. काहीवेळा ही व्यवहारकुशलता  चेष्टेचा विषय होत असली तर तिच्या या कौशल्याला निश्‍चितच दाद द्यावी लागते. साध्या गृहिणीापासून ते उच्चपदस्थ महिलेकडे व्यवहारज्ञान असेल तर संसाराचा रथ योग्य मार्गाने  नेऊ शकते. यामध्ये बचतीचा मंत्रा हा आलाच.  कारण थेंबे थेंबे तळे साचे… ही म्हण तिने मूलत:च अंगीकारलेली असते.  त्यासाठी महिन्यातून काही ठराविक रक्‍कम एका पाकिटात घालून बाजूला ठेवा. 

ही रक्‍कम वर्षभराने एकत्र मोजा आणि बँकेत ठेवून द्या. ही रक्‍कम ऐनवेळीच्या गरजेसाठी उपयुक्‍त ठरेल.  गृहिणीच्या हाती कितीही कमी पैसे देऊन घर चालवायला सांगितले तर ती त्यातून काहीतरी बचत करतेच. तो तिचा अंगभूत गुण आहे. ती संसारासाठी कायमच धनाची पेटी असते.  बचतीतून तिची ही धनाची पेटी भरत कशी जाईल आणि तिच्या बचतीत वाढ होईल, याकडेच सारे लक्ष केंद्रित केलेले असते.   हे सारे व्यवहारकुशलता अंगी बाणवल्यामुळेच होते.

संबंधित बातम्या

बचतीचा हा मंत्र नेहमीच अंगी बाणवल्यामुळे अडचणीच्या वेळी खूपच मदत होते. समजा नातेवाईकांमध्ये अचानकपणे लग्न, वास्तुशांत, वाढदिवस आले तर बजेट कोलमडून जाते. पण यावेळी हा बचतीचा कानमंत्र उपयोगी पडतो. 

आपल्या कोणत्याही कार्यक्रमाला ज्यांचे मोठे गिफ्ट आलेले असते त्यांनाही त्याच तोलामोलाचे, बजेटचे गिफ्ट द्यावे लागते. वरील बचतमंत्रा जपल्यामुळे ऐनवेळची खर्चाची फजिती थांबते आणि घरातील बजेट कोलमडत नाही.  

काहीवेळा आपल्या जवळच्या  नातेवाईकांचा कार्यक्रम असेल तर बर्‍यापैकी आर्थिक जबाबदारीही उचलावी लागते.  तेव्हा कंजुषी करून चालत नाही. 

आपल्या आवडत्या नातलगांना छानसे आवडेल असेल गिफ्ट दिले तर त्यांचा आनंदही द्विगुणीत होतो आणि नात्यातील घट्ट विण विणण्याची ही आयती संधी मिळते. त्यामुळे पैशाची बचत ही नात्यांची व्याप्ती वाढवणारी आणि आनंद देणारी ठरेल.

Back to top button