दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे आयोजित मेकअप अ‍ॅण्ड हेअर स्टाईल वर्कशॉपला उत्तम प्रतिसाद

सांगली : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे   मिरज मधील महिलांसाठी मेकअप अ‍ॅण्ड हेअर स्टाईल वर्कशॉप आयोजित केले आहे. सांगलीमध्ये रविवार (दि.14) राजपूत शैक्षणिक संकुल व्हाईट हाऊस येथे हे वर्कशॉप झाले. या वर्कशॉपला महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. यावरून हे लक्षात आले की, आजही महिला आपण सुंदर दिसण्यावर अधिक भर देतात. 

या वर्कशॉपमध्ये सांगलीतील पहिल्या मेकअप स्टुडिओच्या व आनंदस् प्रोफेशनल फॅमिली सलून अ‍ॅण्ड अ‍ॅकॅडमीच्या संचालिका किशोरी साळुंखे यांनी मेकअप अ‍ॅण्ड हेअरस्टाईलचे प्रात्यक्षिक दाखविले. महिलांना कोणत्याही कार्यक्रमासाठी जाताना पटकन कसे आवरता येईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. 

पुढारी कस्तुरी क्‍लबने प्रत्येकवेळी महिलांना उपयुक्‍त असे वर्कशॉप आयोजित केले आहेत. महिलांच्या कलागुणांना वाव देणारे असे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशी प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी दिली.

यावेळी कस्तुरी क्‍लबच्या संयोजिका तनीम यांनी नवीन मेंबरशिपची माहिती दिली.  अधिक महितीसाठी संपर्क : तनीम : 9325477714

मिरजेमध्ये उद्या होणार वर्कशॉप

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे  महिलांसाठी मेकअप अ‍ॅण्ड हेअर स्टाईल वर्कशॉप आयोजित केले आहे. मिरजेमध्ये दि. 16 जुलैै (मंगळवार) रंगशारदा हॉल, किल्ला भाग, मिरज येथे दुपारी 2 ते 4  या वेळेत हे वर्कशॉप होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news