International Dog Day 2022 : २६ ऑगस्टलाच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय श्वान दिन

२६ ऑगस्टलाच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय श्वान दिन
International Dog Day 2022
International Dog Day 2022 : २६ ऑगस्टलाच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय श्वान दिन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आंतरराष्ट्रीय श्वान दिन, दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या २६ तारखेलाच आंतरराष्ट्रीय श्वान दिन साजरा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का ऑगस्टच्या २६ तारखेलाच का साजरा करतात श्वान दिन. चला तर मग पाहूया या दिनाची (International Dog Day 2022 ) पार्श्वभूमी

तुमचा लाडका प्राणी कोणता असं विचारलं तर बरेच जणांचे उत्तर हे कुत्रा असेल. बऱ्याच जणांनी शाळेत तुमच्या आवडत्या प्राण्यावर निबंध लिहा अस म्हटल्यावर कुत्र्यावर भरभरुन लिहलं असेल. पण तुम्हाला माहीत आहे का? आंतरराष्ट्रीय श्वान दिन कधी आणि का साजरा करतात. त्याला एक पार्श्वभूमी आहे.

कॉलिन पेग यांनी २००४ साली ऑगस्ट महिन्याच्या २६ तारखेला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय श्वान दिन साजरा केला. (International Dog Day) प्राण्यांसाठी काम करणाऱ्या आणि पेशाने वकील असणाऱ्या कॉलिन पेग यांनी निवारागृहातून एक श्वान दत्तक घेतला.

त्याला शेल्टी नाव दिले. तेव्हा त्या दहा वर्षांच्या होत्या. ज्या दिवशी ते कुत्रं घरी आणलं ती तारीख होती ऑगस्ट महिन्याची २६ तारीख. या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. २६ ऑगस्ट २००४ साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय श्वान दिन साजरा केला. तेव्हापासून आजपर्यंत हा दिवस २६ ऑगस्टला साजरा करतात. हा दिवस श्वानांचे महत्व आणि सुरक्षित वातावरण अधोरेखित करणारा दिवस साजरा केला जातो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news