Historic Debt: ब्रिटीशांनी १९१७ मध्ये घेतलेले ३५ हजार रुपये परत द्या! भारतीय कुटुंबाची मोठी मागणी; काय आहे प्रकरण?

भोपाळच्या रूथियांनी ब्रिटीशांनी १०० वर्षापूर्वीचं कर्ज अजून नाही फेडलं; आता त्या ३५,००० हजाराची किंमत...
Historic Debt
Historic Debtpudhari photo
Published on
Updated on

British government loan 1917 Seth Jummalal Ruthia: कधी काळी ब्रिटीश साम्राज्याचा सूर्य कधी मावळत नव्हता अशी शेखी ब्रिटीश सरकार मिरवत होतं. मात्र भारतातील मध्य प्रदेशातील एक सर्वसाधारण शहर सेहोरमधील व्यावसायिकाच्या एका कागदावरून ब्रिटीश सरकाचा हा सूर्योदय एका स्थानिक धनिक व्यावसायिकाकडून घेतलेल्या कर्जावर झाला होता हे दिसून येतं.

जवळपास १०९ वर्षापूर्वी म्हणजे १९१७ मध्ये संपूर्ण जगात युद्धाचा भडका उडाला होता. त्यावेळी ब्रिटीश सरकारची अवस्था देखील फारशी चांगली नव्हती. याचदरम्यान, ब्रिटीश सरकारनं भोपाळ संस्थानातील सेठ जुम्मालाल रुथिया यांच्याकडून ३५,००० रूपयाचे कर्ज घेतले होते. त्या काळात ही रक्कम खूप मोठी होती.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटीशांनी हे रुथिया यांचे कर्ज फेडलेले नाही. रुथिया कुटुंबियांनी असा दावा केला आहे की हे कर्ज ब्रिटीश सरकारकडून फेडण्यात आलेलं नाही. आता जवळपास शतकानंतर सेठ जुम्मालाल यांचे खापरपणतू विवेक रुथिया हे कर्ज वसूल करण्याच्या तयारीत आहेत. ते ब्रिटीश सरकारला याबाबत कायदेशीर नोटीस बजावणार आहेत.

याबाबत बोलताना विवेक रुथिया यांना दावा केला की त्यांच्या कुटुंबाला हा कर्जाचा कागद नुकतेच सापडला आहे. यात प्रमाणपत्र आणि काही जुने रेकॉर्ड्स देखील आहेत. विवेक रूथिया म्हणतात, '१९१७ मध्ये माझ्या खापर आजोबांनी स्वर्गीय सेठ जुम्मा लाल रुथिया यांनी ब्रिटीश सरकारला ३५,००० हजाराचं कर्ज दिलं होतं. ही रक्कम त्यांनी अजून पर्यंत फेडलेली नाही.'

विवेक रुथिया यांच्या मते ही कागदपत्रे हे कर्ज ब्रिटीश राजवटीत भोपाळ संस्थानचे प्रशासकीय व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी घेतलं होतं. या कर्जाला युद्ध कर्ज असं नाव देण्यात आलं होतं.

सेठ जुम्मा लाल यांचे हे कर्ज दिल्यानंतर १९३७ मध्ये निधन झालं. तेव्हापासून हे कर्ज अजून फेडलं नसल्याचा दावा रुथिया कुटुंबियांनी केला आहे.

जरी आता ३५,००० ही रक्कम छोटी वाटत असली तरी विवेक रुथिया यांच्या मते सध्याच्या घडीला याची किंमत ही कोटीमध्ये जाते.

ते म्हणाले की, 'जर तुम्ही ही किंमत १९१७ च्या सोन्याच्या दराचा आणि आताच्या सोन्याच्या दराचा आधार धरून मोजली तर ही किंमत खूप मोठी होते. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर कधी काळी युद्धाच्या काळात प्रशासनाला केलेले अर्थसहाय्य आता नशीब उजळवून टाकणारं ठरू शकतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news