

अर्धा डझन अंडी, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, कोबी, कढीपत्ता, हिंग, हळद, गरम मसाला, तेल, हिरव्या मिरच्या, तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ.
लांबट चिरलेली मिरची, कढीपत्त्याची तेलात खमंग फोडणी करा. त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यातच बारीक चिरलेला टोमॅटो घालून मिश्रण नीट शिजवून घ्या. हळद, तिखट, हिंग, आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला, बारीक चिरलेली सिमला मिरची व कोबी घालून पुन्हा परता.
मसाला सरसरीत हवा असल्यास थोडं पाणी घाला. आता मीठ घालून एक उकळी येऊ द्या. अर्धा डझन अंडी उकडून, गार करून, सोलून घ्या आणि त्यांना सुरीने व्यवस्थित चीर मारून ठेवा म्हणजे मसाला त्यात छान मुरेल. मसाल्याला उकळी येऊन तो नीट शिजल्याची खात्री केल्यावर त्यात अंडी सोडा, परतून घ्या, छान वाफ काढा आणि गरमागरम खायला घ्या.