पावभाजी रेसिपी : स्पायसी आणि लो-फॅट पावभाजी कशी कराल?

पावभाजी रेसिपी : स्पायसी आणि लो-फॅट पावभाजी कशी कराल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : पावभाजी (Pavbhaji) खूप लोकप्रिय नाश्ता आहे. खास करून महाराष्ट्रात खूप चवीनं खाल्ली जाते. ही एक अशी डीश आहे की, सर्व वयोगटातील लोक खाऊ शकतात. तर आज आपण स्पायसी, लो फॅट आणि सोपी पावभाजी कशी बनवायची, हे सांगणार आहोत. (पावभाजी मराठी रेसिपी)

महाराष्ट्रात मुंबईची पावभाजी ही खास मानली जाते. मुंबईत स्ट्रीटफूड तसेच विविध हॉटेल्समध्ये उत्तम चवीची अशी पावभाजी मिळते. आजच्या रेसिपीत आपण चटपटीत पण कमी कॅलरीची पावभाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत. ही पावभाजी बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. अगदी कमी वेळात ही पावभाजी बनून तयार होते.

[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="" cusine="भारतीय" difficulty="" servings="" prepration_time="" cooking_time="" calories="" image="06160444" ingradient_name-0="दोन चमचे टेबल स्पून तेल" ingradient_name-1="लोण्याचे चार तुकडे" ingradient_name-2="बारीक कापलेला एक कांदा" ingradient_name-3="एक चमचा आलंलसूण पेस्ट" ingradient_name-4="बारीक चिरलेली एक शिमला मिरची" ingradient_name-5="बारीक चिरलेला एक बटाटा" ingradient_name-6="एक चमचा मिरची पावडर" ingradient_name-7="३ चमचा पावभाजी मसाला" ingradient_name-8="अर्धा कप कापलेला बीट" ingradient_name-9="कप कप बारीक कापलेला टोमॅटो" ingradient_name-10="कोथिंबरी आणि क्यूब बटर" ingradient_name-11="बारीक कापलेला दुधी भोपळा" direction_name-0="मध्यम गॅसवर पॅन ठेवून त्यात तेल आणि लोण्याची काही तुकडे घाला. त्यात चिरलेला कांदा घालून ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्या. नंतर आलंलसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या." direction_name-1="नंतर त्यामध्ये कापलेला दुधी भोपळा घालून आणि चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला बटाटा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या." direction_name-2="बटाटा मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये कापलेला बीट, मिरची पावडर, पावभाजी मसाला अगदी व्यवस्थित मॅश करून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक टोमॅटोची पेस्ट घाला." direction_name-3="त्यानंतर पुन्हा लोणी, कोथिंबीर घालून व्यवस्थित शिजवून घ्या. हे शिजत असताना व्यवस्थित मिक्स करून घ्या. अशा पद्धतीने पावभाजीतील खमंग भाजी तयार झालेली आहे." direction_name-4="यानंतर भाजी एका भांड्यात घालून घ्या. त्यानंतर त्याच गरम असणाऱ्या पॅनवर लोणी टाकून पावाचा उभा काप घेऊन त्यावर भाजून घ्या. त्या पावावर थोडासा पावभाजीचा मसाला घाला. तो पाव ब्राऊन होईपर्यंत भाजा." direction_name-5="एका प्लेटमध्ये… गरमा गरम भाजी बाऊलमध्ये काढून, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि लिंबू घ्या. तसेच खरपूस भाजलेला पाव घ्या आणि मस्तपैकी खमंग पावभाजी खा." notes_name-0="" html="true"]

पहा व्हिडीओ : मुंबईची चमचमीत पावभाजी घरच्या घरी कशी बनवाल?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news