Rajgira Thalipeeth : जिभेचं समाधान करणारे कुरकुरीत राजगिऱ्याचं थालीपीठ | पुढारी

Rajgira Thalipeeth : जिभेचं समाधान करणारे कुरकुरीत राजगिऱ्याचं थालीपीठ

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रावणात आठवड्यातील तीन ते चार दिवस हमखास उपवास असतातचं. उपवासाला तेचतेच पदार्थ खावून कंटाळा येतो. उपवासाच्या पदार्थात थोडाफार बदल केला तर उपवास करणं नकोसं वाटणार नाही. पदार्थ पौष्टीक असेल तर उत्तमच.  आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांसाठी राजगिरा हा उत्तम पदार्थ. आज आपण याचं राजगिऱ्याच कुरकुरीत आणि जिभेचं समाधान करणार  राजगिऱ्याचं थालीपीठची (Rajgira Thalipeeth) रेसिपी पाहणार आहोत.

Rajgira Thalipeeth : साहित्य

राजगिऱ्याचं थालीपीठ आपण बटाटा वापरून करणार आहोत. बटाटापासून आपण उपवासाचे बरेच पदार्थ करतो. राजगिऱ्याचे देखील पदार्थ बरेच करता येतात. त्या पदार्थापैकी आज आपण राजगिऱ्याचे थालीपीठ कसे करतात हे पाहणार आहोत.

 • तीन ते चार उकडलेले बटाटे
 • राजगिऱ्याच्या पीठाच्या दोन वाट्या 
 • तीन ते चार हिरव्या मिरच्या (तुम्हाला  तिखट किती आवडते यानुसार मिरच्या घ्या)
 • चवीनुसार मीठ  
 • छोटा एक चमचा साखर 
 • तूप

Rajgira Thalipeeth : असं बनवा राजगिऱ्याचं थालीपीठ

 • मिक्सरवर राजीगऱ्याचे पीठ करून घ्या
 • बटाटे उकडून घ्या. बटाटे उकडल्यानंतर त्याची साल काढून घ्या, त्यानंतर ते बटाटे एकजीव करुन घ्या
 • वाटुन घेतलेल्या मिरच्या, एक चमचा साखर, चवीपुरत मीठ यांच मिश्रण करुन घ्या
 • एकजीव केलेला बटाटा, राजगीऱ्याचं पीठ आणि वाटुन घेतलेल्या मिरच्या,  साखर,  मीठ यांच मिश्रण एकत्र करुन घ्या
 • त्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ, हिरवी मिरची, मीठ, चिमूटभर साखर यात थोडेसे तूप घालून  व्यवस्थित मळून घ्या
 • त्यानंतर त्याचे मध्यम आकाराचे गोळे करुन घ्या
 • सुती पातळ कापड घ्या. त्यावर पीठाचा गोळा थापा. हाताला चिकटू नये म्हणून थाेडे पाणी लावा. थालीपीठ जाड होणार नाही याची काळजी घ्या.
 • पॅनला तूप लावा त्यावर हळूवार थालीपीठ ठेवून त्‍यामध्ये एक छिद्र पाडा.
 • मंद आचेवर ते थालीपीठ भाजा. एक बाजूने भाजल्यानंतर ते दुसऱ्या बाजूला पण खमंग भाजून घ्या.
 • आवश्यक असल्यास तूप लावा
 • थालीपीठ खाताना चवीसाठी तुम्ही शेंगदाणा चटणी किंवा दही घेवू शकता.

श्रावण स्पेशल : हेही वाचलंत का?

Back to top button