पर्याय ऑप्थेल्मिक टेक्निशियनचा | पुढारी

Published on
Updated on

राकेश माने

आजची स्थिती अशी आहे की, रोजगार आहे परंतु आवश्यक कौशल्यप्राप्त उमेदवार उपलब्ध नाहीत. या कारणामुळेच गुणवत्तेबरोबरच उत्पादन मूल्यदेखील प्रभावित होत आहे. अशा या कौशल्याची आणि मार्गाची निवड केल्यास आपण या क्षेत्रात रोजगार मिळवण्यासाठी सक्षम असाल. हे कौशल्य म्हणजे पॅरामेडिकल फिल्डशी संबंधित ऑप्थेल्मिक टेक्निशियन अर्थात डोळ्याच्या डॉक्टरसमवेत सहायक, मदतनीस म्हणून काम करणे होय. 

ऑप्थेल्मिक टेक्निशियन हा असा व्यक्ती असतो की जो नेत्ररोग तज्ज्ञांसमवेत सहायकाचे काम करत असतो. रुग्णांचा केसपेपर तयार करणे, त्याच्या उपचाराची नोंद ठेवणे, उपचाराशी निगडीत असलेल्या उपकरणाची माहिती असणे आणि डॉक्टरांना ते उपकरण वापरताना मदत करणे आदी भूमिका नेत्ररोग सहायकास पार पाडावी लागते. देशात अनेक सरकारी आणि बिगरसरकारी संस्थेतून आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. पॅरामेडिकल फिल्डअंतर्गत असलेल्या या प्रकारच्या टेक्निशियनला सध्या भरपूर मागणी आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या संधीदेखील विपूल प्रमाणात उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे, हे अभ्यासक्रम नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिलकडून मान्यताप्राप्त आहेत. अशा स्थितीत आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नसेल तर या अभ्यासक्रमाच्या मदतीने आपण अर्धे स्वप्न तरी पूर्ण करू शकतो. 

नेत्ररोग तंत्रज्ञ कसे होता येईल? : ऑप्थेल्मिक टेक्निशियन होण्यासाठी आपल्याला पदवी किंवा पदविका प्राप्त करणे गरजेचे आहे. डिप्लोमा कोर्स हा दोन वर्षांचा असतो. एक ऑप्थेल्मिक अस्टिटंटचे काम हे डोळ्याच्या आजाराचे निदान आणि उपचार हे होय. या शिवाय, क्लिनिकल डेटा एकत्र करणे, रुग्णाचे रेकॉर्ड मेंटेन ठेवण्याची जबाबदारी असते. ऑप्थेल्मिकनुसार अनेक प्रकारचे डोळ्यांशी संबंधित क्लिनिकल फंक्शन केले जातात. ऑप्थेल्मिक असिस्टंट डोळ्यांच्या डॉक्टरांना रुग्णांचा आजाराचा इतिहास, विविध प्रकारचे तांत्रिक मदत आणि तपासात मदत करण्याचे काम करतो. 

• पात्रता :  हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 12 वी पास उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीसारख्या विषयाचे अध्ययन केलेले असेल. यात प्रवेश परीक्षेचेहीं आयोजन केले जाते. त्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजीत पास होणे गरजेचे आहे. याशिवाय रेटिनोस्कॉपी, डोळ्यांशी संबंधित आजारांची माहिती, लेन्सची माहिती, फ्रेम कॅसेट तयार करणे गरजेचे आहे. 

•अभ्यासक्रमादरम्यान… मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, ग्लुकोमा ट्रिटमेंट, लहान मुलांचे डोळ्यांचे विकार, मेडिकल रेटिना ऑप्थेमोलॉजी आणि न्युरो ऑप्थोमोलॉजी या क्षेत्राचा अभ्यासक्रमात समावेश असतो. या अभ्यासक्रमांतर्गत लेंसोमेटिरी ऑक्यूलर फार्माकोलॉजी, केराटोमेटरी, आय मसल्स, रेफ्रोक्टोमेट्री, व्हिज्युअल एक्यूटी आदींचे अध्यापन केले जाते. डिप्लोमा इन ऑप्थोमिलॉजी हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. 

संधी: डिप्लोमा इन ऑप्थोल्मिलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सरकारी आणि बिगर सरकारी डोळ्याचे दवाखाने, हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, इन्स्टिट्यूट, मेडिकल कॉलेज, कम्युनिटी क्लिक ऑपरेशन थिएटर, लेसर आय सर्जरी क्लिक आदी क्षेत्रात रोजगाराची संधी मिळू शकते. 

प्रमुख संस्था :

दिल्ली पॅरामेडिकल अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली • शिवालिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, चंदिगड,• पॅरामेडिकल कॉलेज, दुर्गापूर, पश्‍चिम बंगाल • भारतीय विद्यापीठ डिम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज, पुणे • विजयनगर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, बेल्लारी, बंगळूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news