महाराष्ट्र गट – क सेवा पूर्वपरीक्षा | पुढारी

Published on
Updated on

शासनाच्या विविध विभागातील एकूण 862 पदाच्या भरतीकरीता लोकसेवा आयोगाकडून ऑनलाईन पद्धतीने 11 एप्रिल, 2018 पूर्वी अर्ज मागविण्यात येत आहेत. परीक्षा 10 जून 2018 रोजी घेण्यात येणार आहे. यामध्ये दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट 'क'च्या एकूण 33 जागा, कर सहायक गट क एकूण 478 जागा, लिपिक टंकलेखक (मराठी) गट क एकूण 316 जागा, लिपिक टंकलेखक (इंग्रजी) 35 जागा सर्व पदासाठी पूर्वपरीक्षा एकत्र घेण्यात येईल.

वेतन : दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – 5200-20200 ग्रेड 3500 + भत्ते, कर सहायक – 5200-20200 ग्रेड – 2400 + भत्ते, लिपिक टंकलेखक 5200-20200 ग्रेड – 1900 + भत्ते.

वयोमर्यादा : दुय्यम निरीक्षक – अमागास – 38 वर्षे, मागासवर्गीय 43, कर सहायक – अमागास 38 वर्षे, मागासवर्गीय 43, लिपिक टंकलेखक – अमागास 38 वर्षे, मागासवर्गीय 43.•

पात्रता : भारतीय नागरिक असावा. विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य अर्हता, पदवी. शेवटच्या वर्षातील उमेदवार पूर्व परीक्षा देऊ शकतो. उमेदवाराला मराठी वाचता,  लिहिता, बोलता येणे आवश्यक.

दुय्यम निरीक्षकपदासाठी – शारीरिक अर्हता – पुरुष – उंची – 165 सेंमी, छाती – 79 सेंमी, फुगवून 5 सेंमी जास्त. • महिला – उंची 155 सेंमी, वजन – 50 किलो किमान असावे.

• कर सहायक व लिपिक – टंकलेखक पदासाठी – कर सहायक – मराठीचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा.

लिपिक टंकलेखक – मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजी – टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रतिमिनिटचे उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक.

संगणक टंकलेखन अर्हता, बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी 30 शब्द प्रतिमिनिट अथवा बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट समकक्ष अर्हता स्वीकार्ह आहे.  शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची उपरोक्‍त टंकलेखन अर्हता मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्‍त करणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क : अमागास 374 तर मागासवर्गीय 274, माजी सैनिक 24.•

परीक्षेचे टप्पे : पूर्व परीक्षा 100 गुण, मुख्य परीक्षा 200 गुण.

अभ्यासक्रम व संदर्भ : पूर्व परीक्षा 100 प्रश्‍न व 100 गुण वेळ 1 तास प्रश्‍नपत्रिका वस्तुनिष्ट व बहुपर्यायी स्वरूपाची.

चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील चालू घटना, साधारणपणे मागील 1 वर्षापर्यंतच्या घटना माहीत असणे आवश्यक. यासाठी अभिनव प्रकाशनचे किंवा सकाळ प्रकाशनाचे वार्षिकी करा.•

नागरिकशास्त्र : यामध्ये भारताच्या घटनेचा प्रामाणिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्रामप्रशासन या घटकांचा समावेश यासाठी 12 राज्यशास्त्र, रंजन कोळवे सरांचे राज्यघटना व सुधाकर जोशी सरांचे भारताचे शासन राजकारण व महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था – के. आर. बंग सरांचे पुस्तक उपयुक्‍त ठरेल.

इतिहास : आधुनिक  भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास या विषयांचा आवाका खूप असल्यामुळे मोजकेच व महत्त्वाचे वाचन उपयुक्‍त ठरेल. यासाठी 8 वी, 11 वी इतिहास, कथा स्वातंत्र्याची कुमार केतकर, महाराष्ट्राचा इतिहास – डॉ. अनिल कठारे किंवा माढाळ, केसागर प्रकाशनाचे महाराष्ट्राचा इतिहास हा संदर्भ चांगला आहे.

भूगोल : यामध्ये पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अंशाश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी यासाठी 4 थी ते 12 वी भूगोल, सवदी सरांचे महाराष्ट्राचा भूगोल समजून घेण्यासाठी दीपस्तंभ प्रकाशनाचे महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक चांगले आहे.

•अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्‍न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्य्र व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकीय नीती इ. शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षा इ. यासाठी 11 वी, 12 वी अर्थशास्त्र क्रमिक पुस्तके, भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे, अर्थव्यवस्था – देसले व चालू घडामोडी या घटकांचा संदर्भ घ्या.

सामान्य विज्ञान : यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र या घटकासाठी 4 ते 12 वी क्रमिक पुस्तके. सामान्यविज्ञान – अनिल कोलते व कृषिगंगा प्रकाशनाचे सामान्यविज्ञान हे पुस्तक करा. विज्ञानघटक समजून घेऊन करा. पाठांतराचा उपयोग नाही.

बुद्धिमापन चाचणी : समग्रबुद्धिमापन चाचणी – अभिनव प्रकाशन व किरण गायकवाड सरांचे बुद्धिमापन चाचणी व के सागर प्रकाशनाचे सराव बुद्धिमापन चाचणी सोडवा.

• अंकगणित : या घटकासाठी गणित गुरु किंवा मॅजिक ऑफ मॅथ्स – नितीन महाले सरांचे पुस्तक उपयुक्‍त ठरेल.

• अभ्यासाची दिशा : सर्वप्रथम झालेले पेपर अभ्यासा. मग शालेय क्रमिक पुस्तके वाचून काढा व त्याला एक संदर्भ पुस्तकाची जोड द्या. सराव प्रश्‍नसंच भरपूर सोडवा. आयोगाच्या प्रश्‍नाचे स्वरूप बघून स्वतः तसे प्रश्‍न तयार करा. तीच तीच पुस्तके वाचत बसू नका. एकदा संकल्पना समजून घेतलात की सरावावर भर द्या. चालू घडामोडी, विज्ञान, गणिक व बुद्धिमापन हे घटक पक्के करून ठेवा. आयोगाने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सर्वांसाठी  पेपर क्रमांक 1 -14 ऑक्टो. 2018,  लिपिक टंकलेखक – 21 ऑक्टो. 2018, दुय्यम निरीक्षक – 4 नोव्हेंबर 2018, कर सहायक 2 डिसेंबर 2018. त्यामुळे वेळेचे नियोजन करून अभ्यासाला सुरुवात करा. अधिक माहितीसाठी www.mahampsc.mahaonline.gov.in यावर संपर्क करा.

महिला बालविकास अधिकारी- गट- ब

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महिला व बालविकास विभाग या पदाच्या 45 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 9 एप्रिल 2018 पर्यंत अर्ज सादर करावयाचा आहे.

वेतन –  9300-34800 + ग्रेड पे 4,400 + भत्ते • पात्रता – उमेदवार भारताचा नागरिक असावा, उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवार 1 जुलै, 2018 रोजी अमागास उमेदवाराकरिता 38 वर्षे व मागासवर्गीयासाठी 43 वर्षे वयोमर्यादा, उमेदवार कला, विज्ञान, वाणिज्य, कृषी कायदा, समाजकार्य, मानसशास्त्र, गृहविज्ञान या विषयातील पदवीधारक असावा. या पदासाठी वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवीधर पात्र नाहीत.

शुल्क– अमागासवर्गीय 374 तर मागासवर्गीय 274 रु.  परीक्षा पद्धत व अभ्यासक्रम :- लेखी परीक्षा 200 गुणाची व मुलाखत 50 गुणांची असेल. प्रश्‍नसंख्या 100 व गुण 200 कालावधी 1  तास, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. •

सामान्य अध्ययन :- यामध्ये जागतिक, भारतातील, महाराष्ट्रातील चालू घडामोडी इ. घटकांचा समावेश यासाठी, अभिनव वार्षिकी व चालू घडामोडी. तसेच सकाळ वार्षिकी सोबत पृथ्वी परिक्रमा मासिक करा. •

बुद्धिमापन चाचणी, समग्र बुद्धिमापन चाचणी– सानप व पठाण तसेच प्रतियोगिता साहित्य प्रकाशनाचे बुद्धिमापन चाचणी हा संदर्भ वापरा.  • अंकगणितः या घटकासाठी पंढरीनाथ राणे किंवा गणित गुरु पुरेसे होईल. • व्याकरण : मराठीसाठी गो. रा. वाळिंबे व श्रीपाद भागवत तर इंग्रजीसाठी सुदेश वेळापुरे व ए. जे. शेख इंग्रजी व्याकरण सोबत आयोगाचे झालेले पेपर सोडवा.  •

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र– यासाठी 4 थी ते 12 वी विज्ञान क्रमिक पुस्तके व सोबत अनिल कोलते सरांचे विज्ञान व  प्रकाशनाचे जीवशास्त्र व आरोग्यशास्त्र. 

समाजशास्त्र– यासाठी 11 वी, 12 वी समाजशास्त्र तसेच समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना- सर्जेराव साळुंखे. • मानसशास्त्र– 11 वी, 12 वी मानसशास्त्र व आधुनिक सामान्य मानसशास्त्र- डॉ. विलास पाध्ये.  •

माहिती व संज्ञापन तंत्रज्ञान– या घटकासाठी संगणक व माहिती तंत्रज्ञान स्टडी सर्कल तसेच ठशश्ररळलश्रश प्रकाशनाचे संगणक माहिती तंत्रज्ञान करा. •  समाजकार्य– या घटकासाठी प्राजक्‍ता टांकसाळे यांचे पुस्तक करा. •

भारतीय संविधान– यासाठी 12 वी राज्यशास्त्र, रंजन कोळंबे सरांचे राज्यघटना व पंचायतराज हे पुस्तक करा. •

मानवी हक्‍क– या घटकासाठी स्टडी सर्कल व के. सागर प्रकाशनाचे मानवी हक्‍क हे संदर्भ करा किंवा मुकूंद प्रकाशन.  • महिला व बालविकास- यामध्ये  योजनांचा समावेश ओ. यासाठी मानव संसाधन या विषयातील योजना करा किंवा दत्ता वानखेडे किंवा शासकीय योजना युनिक प्रकाशनाचे पुस्तक करा. •

महिला व बालक कायदे– यासाठी कायदे स्त्रिया व मुलांचे हे मुकूंद प्रकाशनाचे पुस्तक करा. • गृहविज्ञान- यासाठी 11 वी अन्‍नशास्त्र, इंदिरा खडसे यांचे अन्‍नशास्त्र व पोषण आणि आहार-  प्रा. शोभा वाघमारे मातृकला बालविकास व बालशिक्षण- प्रा. प्रियवंदा लाटकर.

बालविकास व महिला विकास – 12 वी बालविकास, इंदिरा खडसे यासोबतच सामुदायिक विकास, विस्तार शिक्षण व महिला सबलीकरण- डॉ. उज्ज्चला वैरागटे व मुळे यांचा संदर्भ करा.  यासोबत के सागर प्रकाशनाचे महिला व बालविकास हे एकत्रित पुस्तक प्रकाशित झाले आहे.

प्रा. जॉर्ज क्रूझ

Tags : Maharashtra Government service, Maharashtra Group, c service, Pre examination,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news