How to become business analyst |बिझनेस ॲनालिस्ट बनायचंय?

How to become business analyst |बिझनेस ॲनालिस्ट बनायचंय?
business analyst
How to become business analyst pudhari photo
Published on
Updated on

- किर्ती कदम

कोणत्याही व्यवसायाची कार्यक्षमता को वाढवण्यासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि भविष्यातील धोरणे आखण्यासाठी डेटाचा वापर करून मार्गदर्शन करणाऱ्या तज्ञ्जाला विझनेस अॅनालिस्ट असे म्हणतात. बारावीत कोणत्याही शाखेतून (विज्ञान, वाणिज्य किंवा कला) शिक्षण पूर्ण केल्यानंतर या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी निश्चित अशा वाटा उपलब्ध आहेत.

या करिअरची सुरुवात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पदवी स्तरावर योग्य विषयांची निवड करणे महत्त्वाचे ठरते. वाणिज्य (कॉमर्स) शाखेतील विद्यार्थ्यांनी बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) किवा बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) यांसारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य दिल्यास त्यांना व्यवसायाची मूलभूत तत्त्वे समजणे सोपे जाते. विज्ञान शाखेतील विद्यार्थी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए) किंवा माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी घेऊन तांत्रिक बाजू भक्कम करू शकतात. विशेषतः ज्यांना गणितात गती आहे, अशा विद्यार्थ्यांना हे क्षेत्र अधिक सुलभ जाते. कारण यामध्ये सांख्यिकी आणि तर्कशास्त्राचा मोठा वाटा असतो.

बिझनेस अॅनालिस्ट होण्यासाठी केवळ पदवी शिक्षण पुरेसे नसते, तर काही विशेष कौशल्ये आत्मसात करावी लागतात. यामध्ये प्रामुख्याने संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची वृत्ती आणि विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता यांचा समावेश होतो. तांत्रिक कौशल्यांमध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सलवर प्रभुत्व असणे अनिवार्य आहे. तसेच एसक्यूएल, पायथन किंवा आर यांसारख्या प्रोग्रामिंग भाषांचे मूलभूत ज्ञान असल्यास मोठ्या प्रमाणावरील डेटाचे विश्लेषण करणे सोपे होते. आजकाल टॅबलो किंवा पॉवर बीआय यांसारख्या डेटा व्हिज्युअलायझेशन साधनांची ओळख असणे हे करिअरच्या दृष्टीने एक मोठे प्लस पॉईंट ठरते.

बारावीच्या स्तरावर विद्यार्थ्यांनी जर या क्षेत्राचा विचार केला असेल, तर त्यांनी पदवीसोबतच काही ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे. उदाहरणार्थ, आयआयबीए (इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अॅनालिसिस) द्वारे दिले जाणारे ईसीबीए (एंट्री सर्टिफिकेट इन बिझनेस अॅनालिसिस) हे प्रमाणपत्र या क्षेत्रातील नवोदितांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. अशा प्रमाणपत्रांमुळे उमेदवाराची विश्वासार्हता वाढते आणि नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळण्याची शक्यता बळावते.

करिअरच्या संधींबद्दल बोलायचे झाले तर आयटी कंपन्या, बैंकिंग आणि वित्त संस्था, ई-कॉमर्स कंपन्या आणि सल्लागार संस्थांमध्ये बिझनेस अॅनालिस्टची मोठी गरज असते. सुरुवातीला ज्युनिअर बिझनेस अॅनालिस्ट म्हणून काम केल्यानंतर अनुभवानुसार सीनिअर अॅनालिस्ट, प्रोजेक्ट मॅनेजर किंवा बिझनेस आर्किटेक्ट अशा वरिष्ठ पदांपर्यंत पोहोचता येते. या क्षेत्रात सुरुवातीचे वेतन देखील इतर क्षेत्रांच्या तुलनेत आकर्षक असते आणि जागतिक स्तरावर कामाच्या संधी उपलब्ध होतात.

थोडक्यात सांगायचे तर, बारावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना व्यवसायाची गणिती बाजू आणि तांत्रिक कौशल्ये यांचा संगम साधायचा आहे, त्यांच्यासाठी बिझनेस अॅनालिस्ट हे एक उत्तम करिअर आहे. केवळ तांत्रिक पदव्या मिळवण्यापेक्षा प्रत्यक्ष व्यवसायाला नफा मिळवून देणारी धोरणे आखण्याची आवड असलेल्या तरुणांसाठी हे क्षेत्र भविष्यात म यशाची मोठी शिखरे गाठून देऊ शकते. कल्पकता, चिकाटी आणि सतत नवीन तंत्रज्ञान शिकण्याची तयारी असल्यास बिझनेस अॅनालिस्ट म्हणून एक यशस्वी आणि अर्थपूर्ण प्रवास निश्चितपणे करता येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news