मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील तरुणांसमोर सध्या रोजगाराच्या अनेक समस्या उभ्या आहेत. गेल्या वर्षभरात कोरोना बरोबरच अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाच्या संकटांनी राज्यातील जनता भरडली गेली. कोरोना प्रादुर्भाव वाढला तसे अनेकांचे रोजगार गेले. अनेक विद्यार्थ्यी हे आपले शिक्षण पूर्ण करून जॉबच्या शोधात होते. पण खासगीसह सरकारी क्षेत्रात नवीन नोकर भरती थांबल्याने त्यांच्यापुढील समस्यांमध्ये भर पडली.पण जे विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील तरुण आहेत त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील तरुणांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वाहन चालक प्रशिक्षण योजना आहे. या उमेदवारांना वाहन चालक प्रशिक्षण घेता येते. (सध्या काही तांत्रिक अडचणींच्या कारणास्तव ही योजना शासनाने थांबविली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे संपर्क करावा )
अधिक वाचा : आपल्याला शिकायचे आहे? तेही शहरात? आपण मागास वर्गीय विद्यार्थी आहात? मग काळजी नको… ही योजना आपल्यासाठी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मोटार वाहन चालक प्रशिक्षण या योजनेनुसार विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील युवक व युवतींना वाहन चालक व वाहक प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेमार्फत मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यात प्रशिक्षण देण्यात येते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेनुसार प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस शासन खालीलप्रमाणे रक्कम अदा केली जाते. त्याचबरोबर लाभार्थ्यांना पोस्टाने चालक/ वाहक परवाना पाठविण्यासाठी प्रतिलाभार्थी रु.१०० रू एवढी रक्कम देण्यात येते.
अधिक वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या आहेत 'या' योजना, लाभ घेण्यासाठी करा मुदतीपूर्वी अर्ज
प्रशिक्षण प्रकार प्रशिक्षण दर रु. प्रशिक्षण कालावधी
हलके वाहन ४२६४ रू ४० दिवस
अवजड वाहन ४९६० रू ४० दिवस
वाहन १७२८ रू ८ दिवस
योजना कोणासाठी?
विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ इतर मागासवर्ग / विशेष मागास प्रवर्गातील युवक व युवतींसाठी
अधिक वाचा : पोस्टाच्या योजना मुदतीपूर्वी बंद करताना…
योजनेतील अटी :
१) उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
२) तो विजाभज /इमाव व विमाप्र प्रवर्गाचा असावा.
३) मोटार परिवहन अधिनियमातील तरतुदीनुसार उमेदवाराची वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता असावी.
अधिक वाचा : राज्य सरकारकडून महिला योजनांसाठी आखडता हात
प्रशिक्षण कालावधीमध्ये होणारा खर्च देणार प्रशिक्षण संस्था
मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेनुसार प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना कोणतेही अडचण येवू नये म्हणून शासनाने विशेष लक्ष घातले आहे. या योजनेनुसार कालावधीमध्ये जिल्हा कार्यालय ते प्रशिक्षण केंद्रापर्यंत जाणे येण्याचे भाडे, आरोग्य तपासणी, छायाचित्र, चालकाचा कच्चा व पक्का परवाना, वाहक परवाना व बिल्ला, राहण्याची व जेवण्याची व्यवस्था ही प्रशिक्षण संस्थेमार्फत केली जाते. जो लाभार्थी हा प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहात रहात नाही. त्या चालक प्रशिक्षणार्थीला ३०० रू आणि वाहक प्रशिक्षणार्थ्यीला १५० रू विद्यावेतन प्रशिक्षण संस्थेकडून दिले जाते.
अधिक वाचा : संजय गांधी निराधार अनुदान योजना : योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे व कोणी करावा?
अर्ज करण्याची पध्दत
विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ इतर मागासवर्ग / विशेष मागास प्रवर्गातील युवक व युवतींनी मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज हा संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे करावा. (सध्या काही तांत्रिक अडचणींच्या कारणास्तव ही योजना शासनाने थांबविली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे संपर्क करावा.)
साभार : महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग