सोशल मीडियातील करिअरसंधी

सोशल मीडियातील करिअरसंधी
Social Media
सध्याच्या मोबाईलच्या विश्वात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेतFile Photo
Published on
Updated on

अंजली महाजन

सध्याच्या मोबाईलच्या विश्वात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या साधारण 50 टक्के लोकांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे. यातील अनेक जण त्यांचा बहुमूल्य वेळ सोशल मीडियावर व्यतीत करतात.

आजच्या काळात उत्पादक कंपन्यांनाही एखाद्या उत्पादनाचे लॉन्चिंग, बिझनेस मार्केटिंग यासोबतच बिझनेस कम्युनिकेशन आणि रिसर्च यांसारखे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. सोशल मीडिया जर तुमची फॅशन असेल, तर तुम्हीदेखील यामध्ये करिअर करू शकता. यासाठी गरज आहे ती केवळ काही कौशल्ये विकसित करण्याची. अशी कौशल्ये असणार्‍या उमेदवाराला गुगल, फेसबुक, लिंक्डइन आणि ट्विटर यांसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या, आयटी क्षेत्रात कामाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

पात्रता

या क्षेत्रामध्ये येण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक पार्श्वभूमीची आवश्यकता नाही. कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी यामध्ये करिअर करू शकतो. यामध्ये काम करण्यासाठी तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल चांगले असले पाहिजे. या क्षेत्रात क्लायंटसोबत रायटिंगमध्ये डिल केली जाते. त्यामुळे तुमच्याकडे रायटिंग स्किल्स असणे गरजेचे आहे. डिजिटल मीडियातील सोशल मीडिया, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनस, ई-मेल मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, एफिलिएटेड मार्केटिंग यांची माहिती असणे गरजेचे आहे.

कामाचे स्वरूप

सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी वस्तू अथवा सेवा यांची प्रसिद्धी करून ती लोकप्रिय बनवण्याचे काम या क्षेत्रातील उमेदवारांना पार पाडावे लागते. यासाठी एखादी कंपनी तुम्हाला चांगला परतावा देऊ शकेल.

येथे आहे नोकरीची संधी

ज्या डिजिटल मार्केटिंग एजन्सी दुसर्‍या कंपन्यांसाठी काम करतात, अशा ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. याखेरीज अनेक कंपन्या स्वतःच डिजिटल मार्केटिंगसाठी तज्ज्ञांची निवड करतात. ई-कॉमर्स, एफएमसीजी, मीडिया, आयटी, ट्रॅव्हल, फायनान्स, बँकिंग यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया तज्ज्ञांची मागणी असते. त्याशिवाय आज अनेक कंपन्या सोशल मीडिया स्पेशालिस्ट हायर करत आहेत. या तज्ज्ञांकडून सोशल साईटस्वर प्रॉडक्ट लाँचिंग, ग्राहकांसोबत चर्चा करणे आणि संशोधन करणे यासारखे काम केले जाते. मुंबई, दिल्ली, बंगळूरू, हैदराबाद, चेन्नई येथे या क्षेत्रामध्ये चांगल्या संधी आहेत. सुरुवातीच्या काळात उमेदवारांंना साधारण 15 ते 20 हजार वेतन मिळू शकते.

प्रमुख कोर्स

  • सर्टिफाईड डिजिटल मार्केटिंग मास्टर कोर्स

  • सर्टिफिकेशन प्रोग्राम इन डिजिटल मार्केटिंग

  • प्रोफेशनल डिप्लोमा इन सोशल मीडिया मार्केटिंग

  • प्रोफेशनल डिप्लोमा इन सर्च मार्केटिंग

  • प्रोफेशनल डिप्लोमा इन मोबाईल मार्केटिंग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news