Threat of Photo Viral : अश्लील फोटो व्हायरलची धमकी देऊन लैंगिक अत्याचार

अंधेरीतील घटना; आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
accused-of-three-years-of-abuse-arrested-and-in-police-custody
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचारFile Photo
Published on
Updated on

मुंबई : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहित मैत्रिणीवर तिच्याच मित्राने लैंगिक अत्याचार करून तिचे सोन्याचे दागिने लंपास करत पलायन केले. याप्रकरणी योगेश नावाच्या आरोपी मित्राविरुद्ध डी. एन. नगर पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.

25 वर्षांची महिला अंधेरी येथे राहते. तिचे बुलढाणा येथे राहणार्‍या योगेशसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यातून ते दोघेही एकमेकांना भेटत होते. याच दरम्यान त्यांनी एकत्र काही फोटो काढले होते. या महिलेचे नंतर दुसर्‍या तरुणासोबत लग्न झाले होते.

accused-of-three-years-of-abuse-arrested-and-in-police-custody
Jalgaon crime news: तरुणीवर अत्याचार करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, चौघांविरोधात गुन्हा दाखल

तीन दिवसांपूर्वी योगेशने तिला अंधेरीतील एका पार्कजवळ बोलावले होते. तिथे गेल्यावर त्याने तिला लग्नाबाबत विचारणा केली होती. यावेळी तिने त्याला नकार दिला होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिचे काही अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तिचे फोटो तिच्या पतीसह नातेवाईक आणि सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने तिच्यावर जबदस्तीने लैंगिक अत्याचार करून तिची सोन्याची चेन आणि अंगठी घेऊन पलायन केले. त्यानंतर त्याने तिचे अश्लील फोटो तिच्या पतीला व्हायरल करून तिची बदनामी केली होती.

या घटनेनंतर तिने डी. एन. नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी मित्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news