

ठळक मुद्दे
उमरखेड शहरामध्ये दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकांचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग
कन्या शाळेच्या एका शिक्षकाने विद्यार्थिनी सोबत संबंध ठेवल्याचे प्रकरणही दाबण्यात आले
एका खासगी शाळेमध्ये अल्पवयीन मुलीला स्कूल बसचालकाने चॉकलेट देऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, असे असंख्य प्रकार वाढत असल्याने पालकांमध्ये धास्ती
उमरखेड (नांदेड) : तालुक्यातील ढाणकी शहरात शिक्षकी पेशाला काळिमा फासवणारी घटना घडली आहे. येथील गुंडेकर कोचिंग क्लासेस चालवणारे शिक्षक संदेश गुंडेकर यांनी एका १६ वर्षीय विद्यार्थिनीसोबत १ डिसेंबर २०२४ पासून ते १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये जवळीकता साधून आमिष देऊन शारीरिक संबंध ठेवले यामुळे ती अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली. तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न संदेश गुंडेकर याने केल्याने त्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे ढाणकी शहरात एकच खळबळ उडाली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या घटनेबद्दल सविस्तर माहिती अशी की, संदेश गुंडेकर यांचे गेल्या तीन वर्षांपासून या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधातून ती विद्यार्थिनी गर्भवती राहिली. चार महिन्यांचा गर्भ असताना गुंडेकर यांनी तिला गर्भपात करण्याच्या गोळ्या दिल्या. या गोळ्यांच्या अति-डोसमुळे विद्यार्थिनीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला उपचारासाठी पुसद येथील लाईफलाईन या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना हे गर्भपाताचे प्रकरण असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पुसद येथील सहायक पोलिस निरीक्षक प्रेम केदार यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने रुग्णालयात येऊन तपास केला आणि गुन्हा दाखल केला. पुसद पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून गुन्हा नोंदवला आणि प्रकरण पुढील तपासासाठी बिटरगाव पोलिस ठाण्याकडे वर्ग केले. बिटरगाव पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवून आरोपी संदेश गुंडेकर याला भोकर (जि, नांदेड) येथून अटक केली. आहे. आरोपीवर २०११/२०२५ कलम ६४ (२) (एफ) (आय) (एम) बीएनएस सहकलम ४, ६ पोक्सोंतर्गत गुन्हा नोद करण्यात आला आहे.
पीडितीच्या जबाबवरून गुन्हा दाखल झाला. पीडितेचा नांदेड येथील शासकीय दवाखान्यात उपचारादरम्यान दि. २२ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला या गंभीर घटनेमुळे ढाणकी शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुढील तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर अन्नमावर करत आहेत.