

मोखाडा : मोखाडा परिसरात रविवारी (दि.27) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एका सात वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. या मुलीवर अतिप्रसंग झाल्याची शक्यता असून याविषयी पोलिसांमार्फत तपास सुरू आहे.
घरालगत राहणार्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेली मुलगी काही वेळाने घरी परतली होती. मात्र पुन्हा मैत्रिणीकडे जेवणासाठी जाते असे सांगून ती निघाली. मात्र वाढदिवस साजरा होऊन देखील मुलगी रविवारी (दि.27) रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने मुलीच्या घरच्यांनी साडेअकरा वाजता मुलीची शोधाशोध सुरू केली. यावेळी मुलगी बेशुद्ध अवस्थेत गावा शेजारील निर्जनस्थळी आढळून आली. त्यानंतर मुलीच्या आई वडिलांनी मुलीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतू डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मुलीवर अतिप्रसंग झाला असल्याची शक्यता प्रथमदर्शी वाटत असल्याने शवविच्छेदनासाठी व अधिक तपासासाठी नाशिक येथे पाठवण्यात आलेला आहे. या घटनेचा अधिक तपास मोखाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले व त्यांची संपूर्ण टिम करीत आहे.