Thane Crime Update : कल्याणमध्ये मुलीसह आईवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

पीडित महिलेडून तक्रार दाखल; एमएफसी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
Tried tampering
अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नPudhari News Network
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याणमध्ये संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. एका 40 वर्षीय बदमाशाने आधी पित्याविना पोरक्या झालेल्या मुलीशी अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून मुलीने बदमाशाच्या तडाख्यातून कशीबशी सुटका करवून घेतली नाही तोच आईवर देखिल या बदमाशाने अतिप्रसंगाचा प्रयत्न केला.

Summary

तीन महिन्यांपूर्वी घडलेला हा सारा प्रकार महात्मा फुले चौक पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने तक्रार केली होती. पोलिसांनी चौकशी करून याप्रकरणी संबंधित इसमाच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यासह भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुरूवारी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात आपल्या मुलीच्या संदर्भात अघटीत घडले. मुलगी संध्याकाळी घरी आली त्यावेळी ती अतिशय अस्वस्थ होती. तिच्या शरीराला दुर्गंधी येत होती. विचारपूस केली असता आपल्या ओळखीच्या काकाने मला आपले वडिल राहत असलेल्या घरी नेले. तेथे आपल्याशी अश्लिल चाळे केल्याचे मुलीने सांगितले. हे ऐकून तक्रारदार महिलेला हादरा बसला.

मुलीशी गैरकृत्य करणारा इसम रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिलेच्या घरात घुसला. तुझा नवरा मयत झाला आहे. तुम्ही येथे आता राहू नका. इमारती खाली एक गाडी उभी आहे. त्यात बसा आणि निघून जा, असा बोलला. आम्ही घर सोडून कुठेही जाणार नाही, असे सांगताच त्याने गळ्यातील ओढणी ओढली. या इसमापासून बचाव करण्यासाठी महिला बेडरूममध्ये निघून गेली. हा इसम महिलेच्या पाठीमागे आला. त्याने धक्का मारून महिलेला बिछान्यावर पाडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची त्या बदमाशाने त्याच्या मोबाईलद्वारे व्हिडियो तयार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला जोरदार प्रतिकार करून धक्का देत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आडदांड बदमाशाने महिलेला धमक्या देत शिवीगाळ केली. घरातून बाहेर जात नसल्याने महिलेने ओरडाओरडा करत त्या बदमाशाला धक्के मारत घराबाहेर काढून दरवाजा आतून बंद करून घेतला. घडल्या प्रकाराने पिडीत महिला प्रचंड अस्वस्थ झाली होती.

आरोपी कल्याण पश्चिमेतील चिखलेबाग परिसरातील

लेकी समान असलेल्या आपल्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणार्‍या त्या बदमाशाने घरात घुसून आपल्याशी देखिल जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घडलेल्या घटनांची लेखी तक्रार पिडीत महिलेने पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी केली असता त्यात तथ्य आढळल्यानंतर पोलिसांनी पिडीत महिलेच्या जबानीवरून बदमाशाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यातील आरोपी हा कल्याण पश्चिमेतील चिखलेबाग परिसरात राहणारा असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news