

ठाणे : उल्हासनगर परिसरातील रिक्षा चोरणार्या सराईत चोरट्यास ठाणे गुन्हे शाखा युनिट - 1 च्या पथकाने शिताफीने अटक करून 3 चोरलेल्या रिक्षा जप्त करण्याची धडक कारवाई केली.
ठाणे गुन्हे शाखा युनिट - 1 च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने त्यांनी, रघुवेल हॉटेल समोर, गोखले रोड, तीन हात नाका नौपाडा ठाणे येथून एक संशयित आरोपी उदय विलास साठे (32) रा. भोसले चाळ, गोकूळ नगर ठाणे यास ताब्यात घेवून त्याच्याकडे केलेल्या तपासात, त्याने ठाणे शहरातील नौपाडा, राबोडी आणि उल्हासनगर-1 या भागातून प्रत्येकी एक रिक्षा चोरल्याची कबुली दिली आहे.
त्याच्याकडून चोरीच्या तीन रिक्षा जप्त करण्यात आलेल्या आहेत. जप्त केलेल्या रिक्षामध्ये मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. या तपासात त्याने नौपाडा, राबोडी उल्हासनगरातून तीन रिक्षा चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांनी, रघुवेल हॉटेल समोर, गोखले रोड, तीन
हात नाका नौपाडा ठाणे येथून उदय यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात, त्याने रिक्षा चोरल्याची कबुली दिली आहे. दरम्यान त्याच्याकडून चोरी केलेल्या तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.