Thane Crime : ठाणे होतंय गुन्हेगारी, नशेडींची नगरी

ठाण्यात अंमली पदार्थ तस्करी आणि वितरण तसेच किरकोळ विक्री राजरोसपणे सुरु असल्याने ठाण्यातच मोठ्या प्रमाणात नशेडी मोकाट फिरताना दिसताहेत
Smuggling
SmugglingFile Photo
Published on: 
Updated on: 

सुरेश साळवे, ठाणे

हळूहळू ठाणे ऐतिहासिक ठाण्याची ओळख बदलत चाललेली आहे. मागील दोन महिन्याच्या कालावधीत ठाण्यात हत्येचा सिलसिला आणि अमली पदार्थ तसेच नशेडींच्या घटनांनी गाजलेला आहे. ठाणे भय मुक्त करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आणि ठाण्यातील विविध राजकीय पक्ष एकत्रित येऊन ठाण्यातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी आणि "भयमुक्त" करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे ठाण्यात अंमली पदार्थ तस्करी आणि वितरण तसेच किरकोळ विक्री राजरोसपणे सुरु असल्याने ठाण्यातच मोठ्या प्रमाणात नशेडी मोकाट फिरताना दिसताहेत यात शंका नाही.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच परिमंडळात असलेल्या ३५ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येचाआकडा हा शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर आहे. तर ठाणे पोलिसांनी आरोपीना अटक करण्याचे काम केलेले आहे. तर अवघे ठाणे आयुक्तालयाचे मनुष्यबळ यांनी अंमली पदार्थ याच्या विरोधात धडक मोहीम सुरु केली. ठाणे पोलिसांनी आता पर्यंत कोट्यवधींचे एमडी अंमली पदार्थ हस्तगत केलेले आहेत.

अनेकांना जेरबंद करून कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे अंमली पदार्थाची नाश करणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबवून हजारो नशेडीनं विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशापान करताना अटक करून त्यांची वैद्यकीय तपासणी करीत त्यांना गजाआड करण्यात आलेले आहे. ठाण्याच्या विविध पोलिस ठाण्याच्या नशेडींच्या विशेष मोहिमेत कारवाईचा आकडा हजार पार झालेला आहे. यावरून जनमानसात आणि गल्लोगल्ली अंमली पदार्थाचा विळखा पडलेला असलयाचे स्प्ष्ट चित्र आहे. आता ठाण्याची ओळख बदलत गुन्हेगारीचे आणि नशेडींचे ठाणे होते कि काय? असा प्रश्न घडलेल्या घटनांवरून वाटत आहे.

Smuggling
Dombivli Crime : २८ वर्षांनी खुनाचा उलगडा

ठाणे आयुक्त हद्दीत खुनाच्या गंभीर गुन्ह्यांनी उचल खाल्ली आहे. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण गाजले. त्यांनंतर उल्हासनगर मध्ये सोशल मीडियाच्या तथाकथित पत्रकार राजवानी याची हत्या, नवीमुंबई मध्ये बेकायदेशीर स्पाची तक्रार करणाऱ्या महिला पत्रकाराला मारहाण आणि दाखल झालेला खोटा गुन्हा हा प्रकारही धोकादायक ठरणारा आहे.

अलीकडच्या काळात ठाण्यात पोलीस नशेडीने केलेली उपनिरीक्षक भोईर यांची हत्या, प्रदीप पूर्णेकर , मुंब्र्यात विद्यार्थ्यांवर वार, जेवणावरून वाद तरुणाच्या डोक्यात बांबूने प्रहार, अशा विविध घटने नंतर ठाणे पुन्हा एकदा थरारले ठाण्यात दोन मुलांनी चक्क दृश्यम सिनेमा प्रमाणे शाळकरी मित्राच्या गळ्यातील सोनसाखळीसाठी त्याच्या दगडाने ठेचून हत्या करून त्याच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांना गुंगारा देत सिनेमा "दृश्यम" प्रमाणे मृतक मुलाचा मोबाईल लोकेशन सापडू नये म्हणून बसमध्ये टाकण्यात आला. या घटनेने शाळकरी मुलांमध्येही क्रूरता आणि पोलिसांना गुंगारा देण्याचा केलेला प्रताप हा ठाण्यातील गुन्हेगारी मानसिकतेत अल्पवयीन मुलांनी केलेले कृत्य हे समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चाललेली असल्याचे गंभीर संकेत देत आहे.

आज ठाण्यात कुणीच सुरक्षित नाही. किंवा नागरिकांच्या मालमत्ता आणि जीवन सुरक्षित नाही. ठाण्यात आता पोलिसांच्या धडक कारवाईने दुचाकीवरील सोनसाखळी खेचण्याचे प्रमाण मदावलेले असले तरीही याच घटना आता मोबाईल चोरीच्या घडत आहे. मोबाईल चोरट्यानी ठाण्यात इतका उच्छाद मांडला आहे कि मोबाईल हातात असतानाही सुरक्षित नाही. एवढेच नव्हे तर चोरट्यानी रिक्षात बसलेल्या आणि धावणाऱ्या रिक्षातील मोबाईल दुचाकीवरून खेचून पोबारा केल्याच्या घटना वाढलेल्या आहेत. रेल्वे स्टेशन, विश्राम गृह, रेल्वे प्लॅटफॉर्म, धावत्या लोकलमध्ये नागरिकांच्या हातातील, खिशातील मोबाईल आणि महिलांचे मंगळसूत्र धोक्यात आहे.

Smuggling
Sambhajinagar Dussehra Market Turnover : दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेला ५०० कोटींचे तोरण

हीच परिस्थिती परिवहन बसमध्येही आहे. ठाणे पोलिसांना जागृत राहण्याची आणि धडक कारवाईची गरज आहे. रोज ठाणेकर लुटला जातोय ही परिस्थितीला जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही कारण एक दुसऱ्याकडे बोट दाखवून हात वर करण्याची प्रवृत्ती बळावत चालली आहे. त्याचेच हे घोतक आहे. जे देश चालवीतात जे राज्य चालवीतात त्यांच्या मागेच या अपप्रवृत्ती वावरताना दिसतात. त्यामुळे गुन्हेगारांवर अंकुश राहणार नाही.

विविध गुन्हेगारीचा आलेख

  • ठाण्यात विद्यार्थ्यांनी केली सोनसाखळीसाठी मित्राची हत्या, मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकार "दृश्यम" सिनेमातल्या सिनप्रमाणे मृतकाचे मोबाईल बसमध्ये टाकून दिला गुंगारा

  • पूर्णेकर प्रकरणात पाच आरोपीना अटक तरीही अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीतच

  • चरईतील घटना पगार मागण्यासाठी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर मॅनेजरने कटरने केला हल्ला...दोन जखमी

  • चिकन बिर्याणी देण्याची मागणी पूर्ण न केल्याने वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहात परत नेले जात असलेल्या एका आरोपीने गोंधळ घातल्याची घटना वागळे इस्टेट परिसरात घडली. आरोपीने लपवून आणलेल्या ब्लेडने स्वतःच्या मानेवर आणि हातावर वार केले. त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगठ्यांवरही त्याने वार केला.

  • मुंब्र्यात जुन्या भांडणाचा राग विद्यार्थ्यांच्या डोक्यात आणि पाठीवर वार

  • मुंब्रा आणि दिव्यात २ कारवाईत मुंब्र्यात ५९.५ ग्रॅम, दिव्यात १४० ग्रॅम एमडी जप्त; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

  • ठाणे शहरात नशेडींच्या विरोधात पोलिसांचा मोर्चा ३ दिवसात ७६ नशेडींवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे

  • तीनहात नाक्यावर गांजाच्या १३ पुड्या जप्त; तरुणाला अटक

  • जेष्ठांना लुटणारे गजाआड , दोन फरार २९ गंभीर गुन्हे दाखल ......१७ गुन्ह्यांची उकल; आणि २४ लाखांचे २१२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news