ठाणे : 2017 साली कापूरबावडी येथे झालेल्या किरकोळ वादात विकास श्यामबहाद्दूर उपाध्याय (21) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपीस सात वर्षानंतर जमठेपेची शिक्षा ठाणे न्यायालयाने ठोठावली आहे.
सूरज प्रदीप जैस्वाल (29) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 2017 साली कापूरबावडी येथे मयत विकास व आरोपी सूरज यांच्या किरकोळ वाद झाला होता. या वादात आरोपी सूरज याने विकासवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात विकासचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीस अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा खटला ठाणे न्यायालयात सुरू होता. दरम्यान, ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी खटल्यातील सर्व साक्षी पुरावे पडताळून या गुन्ह्यात आरोपी सूरज जैस्वाल यास दोषी ठरवून आजन्म सश्रम कारावासाच्या दंडाची शिक्षा ठोठावली.