

मिरा रोड : वसई विरार परीसरात विविध गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला तडीपार करण्यात आले होते. या आरोपीला तडीपार करण्यात आलेले असतानाही आरोपी नालासोपारा परीसरात दिसून आल्याने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.
मोहमद करीम शकील शेख, (31) याच्या विरुध्द आचोळे पोलिस दोन गुन्हे दाखल असून ते न्यायप्रविष्ठ आहेत. हा इसम त्याच्या इतर 8 साथीदारासह टोळीने गुन्हे करत असून त्याच्या साथीदाराविरुध्द 2016 पासुन तुळीज, आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या इसमास गुन्हयात अटक होवूनही त्याचे गुन्हेगारी वृत्तीत बदल झालेला नसुन त्याचे समाज विघटीत कृत्यामुळे समाजाचे व आजुबाजुच्या परीसरात राहणार्या नागरीकांच्या जिवीतास तसेच मालमत्तेस धोका नाकारता येणार नाही. यासाठी मोहमद करीम शकील शेख याला ठाणे, पालघर, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगरे या कार्यक्षेत्रातुन दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र आचोळे पोलीस ठाण्याचे हद्दीत तडीपार शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे.