Thane Bollywood Crime : कोरिओग्राफर रेमो डिसुझासह सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा

Choreographer Remo D'Souza : कोरीओग्राफरसह इतर सात जणांवर गुन्हा दाखल
Remo D'Souza
Indian choreographer and film director
Remo D'Souza, कोरिओग्राफर रेमो डिसुझा Indian choreographer and film directorpudhari file photo
Published on
Updated on

मिरा रोड : डान्स जगतामधील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझा, त्यांची पत्नी व फेम प्रोडक्शन कंपनी यांच्यासह सात जणांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्हि अनबिटेबल डान्स ग्रुप यांची 11 कोटी 96 लाख 10 हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

रेमो डिसुझा (Choreographer Remo D'Souza) हे बॉलिवूड सृष्टीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांची नृत्यदिग्दर्शन केले असुन ते बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर मानले जातात. भाईंदर मधील डान्स ग्रुपची त्यांनी व त्यांच्या इतर सहकार्‍यांनी मिळून फसवणूक केल्याबाबत मिरारोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने डान्सग्रुप यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत न्यायालयाने पोलिसांनी तपास करून चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हे शाखा वसई युनिटचे पोलिस निरीक्षक यांनी तपास करून अहवाल सादर केला. त्यानंतर मिरारोड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांगले टीव्ही-शो मिळतील असे सांगितले...

भाईंदर मध्ये राहणारे डान्सर विर नरोत्तम यांची ओळख ओमप्रकाश चौहान यांच्याशी 2014 साली भाईंदर जेसलपार्क चौपाटीवर डान्सचा सराव सुरू असताना झाली होती. त्यावेळी तुम्ही चांगला डान्स करत असुन तुमचे व्हिडिओ इन्स्टाग्राम, यू ट्यूब वर अपलोड करतो. त्यातून चांगले टीव्ही-शो मिळतील असे सांगितले होते. त्यांना त्याचा सल्ला योग्य वाटल्याने त्यावेळी त्या ग्रुपच्या डान्सर कलाकार यांनी मॅनेजर म्हणून चौहान यांची नियुक्ती केली होती. या ग्रुप मध्ये सर्व डान्सर हे 8 ते 20 वर्ष वयोगटातील आहेत. हा ग्रुप स्टेज शो, डान्स शो, रियालिटी शो याचे आयोजन करत होता.

मुंबईमध्ये 2018 मध्ये झालेल्या डान्स प्लस रियालिटी शो सिजन - 4 या शो मध्ये हा ग्रुप सहभागी झाला होता. त्यांना असिस्टंट कोरियोग्राफर म्हणून रोहीत जाधव हा देण्यात आला होता. त्या शोमध्ये पाच लाखाचे बक्षीस ठरले होते. तर 1 लाखाचे व्हाऊचर दिले होते. त्या शोची रक्कम व व्हाऊचरचे ओमप्रकाश यांनी वाटप केले नाही. यांच्या ग्रुपने 38 दिवस 35 डान्सर सहभागी झाले होते. त्यावेळी प्रत्येक डान्सरला 7 हजार प्रती दिवस पगार दिला जात असे. फ्रेम प्रोडक्शन यांनी 35 डान्सरचा प्रती दिवसाचा पगार असा एकुण 93 लाख 10 हजार देणे आवश्यक होते ते दिले नाहीत. तसेच या शो चे जज रेमो डिसुझा होते, ते या डान्सर कलाकारांच्या जीवनावर चित्रपट काढणार असल्याचे सांगुन ना-हरकत व सह्या घेतल्या. आणि सदर चित्रपट पूर्ण झाल्यानंतर 50 लाख देणार असल्याचा करारनामा केला होता. त्यात रेमो डीसुजा व त्यांची पत्नी लिझेल डिसोझा यांनी 5 लाख 11 हजार दिले होते. त्याचेही पैसे चौहान यांनी दिले नाहीत. त्यानंतर 2019 साली अमेरिका गॉट टॅलेंट सिजन -14 ची ऑफर ई मेल मार्फत आली होती, तेव्हा सर्वांनी स्वखर्चाने स्वतःचे पासपोर्ट काढले व अमेरिकेला गेले होते.

ग्रुपला दिलेल्या डोनेशनचाही गैरवापर

मॅरेथॉन प्रॉडक्शन, अमेरीका यांनी सर्व डान्सर यांच्या विमान तिकीट व रहाण्याचा खर्च केला होता. त्याठिकाणी 60 दिवस थांबले होते. त्यावेळी पण चौहान हा ग्रुपला एका वेळचे जेवण देत होता. हा शो संपल्यानंतर समजले की कंपनी हि प्रत्येक डान्स कलाकारांना प्रत्येक दिवशी 25 डॉलर देत होती. त्याचे 44 लाख 64 हजार दिले होते. तसेच हा शो जिंकल्याने आमच्या ग्रुपला 25 हजार डॉलर बक्षीस मिळाले होते त्याचे पैसे देखील वाटप केले नाहीत. तसेच चौहान याने ग्रूपचा ट्रेडमार्क व लोगो परस्पर त्याच्या नावावर करून घेतला. जानेवारी 2020 मध्ये सर्व कलाकार हाँगकाँग चायनिज फेस्टीवल 2020 येथे शो करीता गेलो असता हा शो कोविड प्रार्दुभावामुळे रद्द झाला परंतु शो चे आयोजकांनी या डान्स ग्रुपला 10 हजार डॉलर इतकी रक्कम ओमप्रकाश चौहान याच्याकडे दिली होती. त्यानंतर लाँकडाऊन दरम्यान ’व्हि अनबिटेबल डान्स ग्रुप’ या आमच्या ग्रुपला भारतासह व परदेशातील संस्थांनी वेळोवेळी डोनेशन दिले त्याचाही गैरवापर चौहान याने केला आहे.

मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जानेवारी 2023 मध्ये दुबई मध्ये ग्लोबल व्हिलेज हा एक महीण्याचा शो केला होता. त्यात 45 सदस्य गेले होते. या शो मध्ये 75 शो केले होते त्यासाठी 2 लाख 88 हजार डॉलर इतकी रक्कम डान्स ग्रुपला मिळाली होती. त्यापैकी या ग्रुपमधील 25 कलाकारांना प्रत्येकी 1 लाख 40 हजार इतकी रक्कम वाटप करुन बाकीची रक्कम चौहान याने स्वतः कडेच ठेवली होती. चौहान याच्याकडे 2015 पासुन फेब्रुवारी 2024 पर्यंत अंदाजे 250 हुन अधिक शो देशात व परदेशात विविध ठिकाणी केले असुन प्रत्येक शो केल्याने तसेच डान्स ग्रुपच्या नावाने युटुब, इंनस्टाग्राम, फेसबुक व्दारे मिळणारे सर्व उत्पन्न मिळून अंदाजे 11 कोटी 96 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी रेमो डिसोझा व लिझेल डिझोझा, ओमप्रकाश चौहान, रोहित जाधव, फेम प्रोडक्शन कंपनी, रमेश गुप्ता यांच्यासह एका पोलीस कर्मचार्‍यांच्या विरोधात मिरारोड पोलीस ठाण्यात फसवणूक केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास करून भारतीय दंड संहितेच्या विविध कलमा अंतर्गत मिरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वसई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख हे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news