धक्कादायक ! थेट मुख्यमंत्र्यांच्याच नावाने बनावट जॉइनिंग लेटर; मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष

जळगाव : तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
Crime News
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला अटक AI Photo
Published on
Updated on

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट सहीचे जॉइनिंग लेटर देऊन मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत चाळीसगावमधील एका तरुणीची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील तरुणीला मुंबई येथील मंत्रालयात क्लार्क पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले. तिच्याकडे देण्यात आलेले जॉइनिंग लेटर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरपॅडवर आणि बनावट सहीसह तयार करण्यात आले होते. त्यामुळे ते खरे असल्याचा भास झाला. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाच्या नियमानुसार अशा लेटरवर संबंधित विभागप्रमुख अथवा सचिवांची सही असते, हे लक्षात आल्यावर तरुणीने संशय व्यक्त केला.

Jalgaon Latest News

बनावट मजकूर अन् बनावट स्वाक्षरी

याप्रकरणी मुख्य आरोपी सर्वेश प्रमोद भोसले याच्याकडे चौकशी केली असता त्याने खळबळजनक कबुली दिली. त्याने इंटरनेटवर "cm officer letter Maharashtra" असे सर्च करून मिळालेल्या नमुन्यावरून खडकी येथील स्वामी ग्राफिक्सवर रणजीत मांडोळे यांच्या मदतीने बनावट मजकूर तयार केला आणि त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची नक्कल सही टाकून जॉइनिंग लेटर तयार केल्याचे उघड झाले.

तपासात आणखी एक आरोपी तुषार उर्फ रोहित मधुकर बेलदार याचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांविरुद्ध चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत. या बनावट दस्तऐवज प्रकरणामुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली असून, अशाप्रकारे आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे, याची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, शहरात मोठ्या फसवणूक रॅकेटचा संशय व्यक्त केला जात असून, या संदर्भात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news