एक होती शीना! कसा झाला 'या' हायप्रोफाईल मर्डर मिस्ट्रीचा उलगडा?

Sheena Bora Murder Case : शीना बोरा हत्याकांड प्रकरण
Sheena Bora Murder Case
शीना बोरा हत्याकांड. file photo
Published on
Updated on
दिलीप भिसे, कोल्हापूर

शीना बोरा हत्याकांड (Sheena Bora Murder Case) म्हणजे राज्यभर गाजलेली एक हायप्रोफाईल मर्डर मिस्ट्री. एका आईनेच आपल्या पोटच्या मुलीचा गळा दाबून खून करून रायगडच्या जंगलात तिचा मृतदेह जाळून आणि नंतर पुरून टाकला होता. जवळपास तीन वर्षे कुणालाही या गोष्टीचा थांगपत्ता लागला नव्हता; पण शेवटी एका निनावी फोनमुळे आणि एका अधिकार्‍याच्या पाठपुराव्यामुळे या खुनाचा उलगडा झालाच. कशी झाली या हायप्रोफाईल मर्डर मिस्ट्रीची उकल. त्याचा हा वृत्तांत...

26 ऑगस्टलाच मिखाइल बोरा हा पोलिसांना सांगतो की, शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जीची बहीण नसून मुलगी आहे. या ट्विस्टनंतर सगळे आश्चर्यचकित होतात. पीटर मुखर्जी सांगतो की, 2002 मध्ये माझं इंद्राणीसोबत लग्न झालं. 2006 मध्ये इंद्राणीने मला शीनाची ओळख करून दिली, तेव्हा शीना ही छोटी बहीण तर मिखाइल हा छोटा भाऊ असल्याचे मला सांगितले होते. मला शीना व मिखाइल ही इंद्राणीची मुलं आहेत हे माहीत नव्हते. हे सर्व मलाही आत्ताच समजले आहे.

आता पुढील चौकशी सुरू होते व खून कसा केला व का केला, याचा शोध घेण्यास सुरू करतात; तेव्हा एका एका गोष्टीचा उलगडा होत जातो. इंद्राणी (परी बोरा) ही 1987 साली तिच्या प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये असते, तेव्हा त्यांना दोन मुले झाली. शीना बोरा व मिखाइल बोरा. या दोघांना गुवाहाटीमध्ये आपल्या आई-वडिलांकडे सांभाळ करण्यास देऊन इंद्राणीने सिद्घार्थ दास यांच्यासोबत रीतसर पहिले लग्न करते. त्यानंतर काही दिवसातच त्यांचा घटस्फोट होतो. त्यानंतर इंद्राणीने कोलकाता येथे जाऊन संजय खन्नासोबत दुसरे लग्न केले. त्या दोघांना विधी खन्ना नावाची एक मुलगी होते. त्यानंतर काही महिन्यांतच इंद्राणी आणि संजय खन्ना यांचा घटस्फोट होतो.

त्यानंतर इंद्राणी 2001 मध्ये मुंबईला येते. एका ठिकाणी नोकरीस सुरुवात करते. तिथे तिची ओळख पीटर मुखर्जीसोबत होते आणि 2002 मध्ये त्यांनी लग्न केले. यावेळी विधी खन्ना ही इंद्राणीच्या दुसर्‍या पतीची मुलगीही उपस्थित असते. 2006 साली इंद्राणीने शीना बोरा व मिखाइल बोरा या दोघांना मुंबईत आणले आणि सर्वांना हे आपले बहीण-भाऊ म्हणून ओळख करून दिली. नंतर शीना बोरा ही एका खासगी कंपनीत नोकरी सुरू करते. पीटर मुखर्जी यांचे पहिले लग्न शबनम नावाच्या एका महिलेसोबत झाले होते. त्या महिलेपासून पीटर यांना दोन मुले होतात, राहुल मुखर्जी व रॉबिन मुखर्जी. आता या कुटुंबात पीटर व इंद्राणी यांची एकूण तीन मुले असतात विधी खन्ना, राहुल मुखर्जी व रॉबिन मुखर्जी. शीना बोरा व मिखाइल बोरा हीसुद्धा इंद्राणीचीच मुले होती; पण इंद्राणी हे कोणाला सांगत नाही व त्यांना आपले बहीण-भाऊ म्हणूनच ओळख करून देत असते.

खुनाचे कारण

शीनाचे वय बावीस वर्षे असते. याच दरम्यान शीना बोरा व राहुल मुखर्जी यांचे प्रेम जुळते व ते लग्न करायचे ठरवतात. शीना व राहुल हे खरे तर सावत्र बहीण-भाऊ आहेत, हे राहुलला माहीत नसते. राहुलसाठी शीना ही त्याच्या सावत्र आईची बहीण ठरते. इंद्राणीला जेव्हा हे प्रकरण समजले, तेव्हा तिने त्यांच्या लग्नाच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. त्यांच्यात त्यांच्यात वाद सुरू होतात. पीटर यांचा मात्र शीना आणि राहुल यांच्या लग्नाला विरोध नव्हता. इंद्राणी जाणून असते की, जर शीना आणि राहुल यांचे लग्न झाले तर पीटरची काही मालमत्ता शीनाकडे जाईल. त्यामुळे इंद्राणीने आधीचा नवरा संजीव खन्ना याच्याशी संगनमत करून शीनाचा काटा काढायचा निर्णय घेतला. शीना बाजूला झाली तर विधीच्या नावे असलेली काही संपत्ती आपल्या नावावर होईल, या आशेने संजीव खन्ना या गोष्टीला तयार होतो. इंद्राणी तिच्या खास ड्रायव्हरला हाताशी धरते व हे तिघे मिळून शीनाचा खून करतात.

इकडे काही दिवसांनी राहुल शीनाला फोन करायचा प्रयत्न करतो; परंतु तिचा फोन लागत नाही. राहुल इंद्राणीला शीनाबाबत विचारतो, तर ती सांगते की, ती आता कायमसाठी अमेरिकाला गेली आहे. राहुलला काही दिवसांनी संशय येतो, त्यामुळे काही दिवसांनी तो शीनाच्या बेपत्ता होण्याबाबत पोलिसांना माहिती देतो. पोलिस घरी येऊन शीनाबाबत चौकशी करतात तर त्यांनासुद्धा इंद्राणीने शीना ही अमेरिकेला गेली आहे, असे सांगते. त्यामुळे पोलिस तक्रार दाखल करत नाहीत व तो विषय तिथेच सोडून देतात. परत काही दिवसांनी राहुलला शीनाच्या फोनवरून एक मेसेज येतो. त्यात लिहिले होते की, ‘मी आता कायमसाठी अमेरिकेला आली आहे. आपले नाते संपले आहे. तू मला शोधण्याचा प्रयत्न करू नको.’ ज्या कंपनीमध्ये शीना कामाला होती, त्या कंपनीला शीनाच्या मोबाईल नंबरवरून राजीनाम्याचा मेसेज आलेला असतो जातो. त्यामुळे राहुल शीनाचा नाद सोडून देतो.

पीटर मुखर्जी यांना अटक

चौकशीदरम्यान काही पुरावे समोर येतात, ज्यावरून असे वाटत असते की, पीटर मुखर्जी यांना अटक होईल. पण मुंबई पोलिस पीटर यांना अटक करत नाहीत. राकेश मारिया यांचे म्हणणे असते की, पुरावे सबळ नाहीयेत. इथे बराच वाद होतो. पोलिसांवर प्रश्न चिन्हे उमटतात. राकेश मारिया यांच्याकडून ही हायप्रोफाईल केस क्राईम ब्रँचला सोपवली जाते. क्राईम ब्रँचला वाटत असते की, पीटर यांचा या खुनात समावेश आहे. परंतु खून झाला तेव्हा पीटर इटलीमध्ये असल्याचा पुरावा पीटरचे वकील सादर करतात. पुढे अजून सखोल चौकशी केल्यावर एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पीटर याचे नाव येते. शीना बोराच्या सिंगापूर येथील अकाऊंटमध्ये पीटरच्या कंपनीमधून पैसे पाठविल्याचे प्रकरण (मनी लॉन्ड्रिंग) समोर येते. यात 19 नोव्हेंबर 2015 ला पीटरला अटक केली जाते.

दरम्यान, क्राईम ब्रँचने फेब्रुवारी 2016 मध्ये त्यांच्या चार्जशीटमध्ये पीटरला शीना बोराच्या खुनाबाबत माहीत होते; पण त्यांनी ते लपवले, असा उल्लेख केला. त्यामुळे पीटर मुखर्जीवरसुद्धा त्याच कलमानुसार गुन्हा दाखल केला जातो. (कलम 302, 120-इ, 201) अशा प्रकारे शीना बोरा हत्याकांडात इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना, श्यामराव ड्राइव्हर व पीटर मुखर्जी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सध्या हा खटला न्यायालयात सुरू आहे. ( उत्तरार्ध )

खून कसा केला?

इंद्राणी शीनाला 24 एप्रिल 2012 रोजी बांद्रा येथे बोलावते. शीना बोराला इंद्राणीने गाडीत बसवते व पाणी पिण्यास देते, ज्यात गुंगीचे औषध असते. त्यामुळे शीना बेशुद्ध होते. त्यानंतर संजीव खन्ना गाडीत बसतो. गाडी मुंबईत असतानाच मागच्या सीटवर संजीव खन्ना व इंद्राणी मुखर्जी बेशुद्ध अवस्थेतील शीनाचा गळा दाबून तिचा खून करतात. संध्याकाळची वेळ असते. हे तिघेही पीटर मुखर्जीच्या घरी जातात. रात्री हे तिघे त्याच गाडीने रायगडला जाण्यास निघतात. शीनाच्या मृतदेहाला दोघांच्या मध्ये मागच्या सीटवर बसवतात. 120 किलोमीटरचा प्रवास करून ते रायगडच्या जंगलात पोहोचतात. तेथे शीनाचा मृतदेह पेटोल ओतून जाळतात व अर्धवट जळालेला मृतदेह तिथेच पुरतात. मृतदेहाचा काही भाग पुरायचे ते विसरतात, त्यामुळे नंतर तो अर्धवट भाग तिथेच बाजूला फेकून देतात व पुन्हा मुंबईला परत येतात. दुसर्‍या दिवशी संजीव खन्ना पुन्हा कोलकात्याला निघून जातो.

Sheena Bora Murder Case
Sheena Bora murder case : शीना बोरा हत्येतील हाडांचे अवशेष गायब सीबीआयची कबुली; हत्याकांड खटल्याला कलाटणी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news