

रेवदंडा (रायगड) : काकाच्या खून प्रकरणी तुरुंगात जावे लागले याचा राग मनात ठेऊन एका इसमाने महिलेचा खुन केल्याची घटना रेवदंडानजीक घडली आहे. अर्चना चंद्रकांत नाईक (वय 36) दिवीवाडी महाजने असे मृत महिलेचे नाव आहे. दत्ताराम नागू पिंगळा यांच्या विरोधात दर्शना किशार नाईक यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अर्चना काशिनाथ नाईक हिचे घराशेजारीच राहणाऱ्या दत्ताराम नागू पिंगळा (रा. गंगेचीवाडी) याचे बरोबर प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या प्रेम संबंधाला तुकाराम सजन्या नाईक यांनी विरोध करीत अर्चना चंद्रकांत अशोक नाईक यांचेशी लावून दिला. या गोष्टीचा राग मनात धरून दत्ताराम नागू पिंगळा याने काकाची हत्या केली होती. त्यामुळे आरोपी दत्ताराम नागू पिंगळा याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. या गोष्टीचा दत्ताराम पिंगळा याने मनात राग धरला होता.
पिंगळा हा जेलमधून सुटून आल्यानंतर त्याने महाजने दिवीवाडी येथे अर्चना नाईक हिला भेटण्यासाठी दर्शना नाईक यांची आईचे घरी आला होता. अर्चना नाईक हिच्याबरोबर बोलत असताना आपापसात वाद विवाद होवून सदर वादाचे रागातून त्याने फिर्यादी यांची मयत बहीण अर्चना रस्सीच्या सहायाने गळा आवळून तिला जिवे ठार मारले. याबाबत रेवदंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले हे करीत आहेत.