

नाशिक : औषधांच्या गोळ्या घेऊन बेडरूममध्ये झोपलेल्या महिलेवर तिच्या पुतण्याने जबरदस्तीने अत्याचार केले. या कृत्याबाबत गुप्तता पाळण्यासाठी त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
पीडित महिला ही श्रमिकनगर परिसरात राहते. सध्या या महिलेवर मानसिक उपचार सुरू आहेत. त्या १९ जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास गोळ्या घेऊन अर्धवट झोपेत असताना पुतण्या तेथे आला. त्याने गैरफायदा घेत नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले. लैंगिक अत्याचाराबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. तसेच बुधवारी (दि. २५) संशयित पुतण्याने महिलेला फोन करून अश्लील भाषेत बोलून पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.