नांदगांव : प्रतिनिधी
न्यायडोंगरी येथे मध्यरात्री बंद दुकाने व घरांचे दरवाजे तोडून ८ ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये तीन सराफी दुकानांचाही समावेश आहे. या घरफोडीमध्ये सुमारे १२ लाख रूपयांचा ऐवज चोरी केला गेला.
घरफोडीत चोरी झालेल्या घटनेत अरुण आहेर यांचे बंद घराचे कुलुप तोडून चार लाख, चंद्रकांत भालेराव यांचे सोनारी दुकानतून २१० ग्रँम सोने, वैभव थोरात यांच्या सोन्याच्या दुकानातून चांदी, मौल्यवन चीज वस्तु व रोख रकमेवर डल्ला मारण्यात आला. सुनिल आहेर, जितेंद्रिय आबड, वैभव थोरात, डॉ विष्णू पाटील, नंदू कटारीया, पोस्ट कार्यालय, किशोर बाविस्कर आदी ठिकाणी चोरांनी घरफोड्या केल्या. दुकाणातील बंद शटर तोडून आत घुसून चोर्या केल्या. या घटनेने न्यायडोंगरी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस घटनास्थळी मध्यरात्रीपासून तळ ठोकून आहेत.