

नाशिक रोड: देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्या घरी चोरीप्रकरणी मोलकरीण संगीता शाम केदारे (रा. जेलरोड) हिला अटक करण्यात आली असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी तिला शनिवारी (दि.19) नाशिक रोड न्यायालयात हजर केले असता, तिला सोमवार (२ दिवस) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आमदार आहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑक्टोबर २०२४ पासून वेळोवेळी घरातून रोकड चोरीस जात होती. गेल्या आठवड्यात कपाटातून तब्बल एक लाख रुपये चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मोलकरीणविरोधात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी संगीता केदारे हिला ताब्यात घेत गुन्ह्याची उकल केली.