

पंचवटी (नाशिक) : म्हसरूळ परिसरातील सीता सरोवरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृताच्या तोंडातून फेस आढळल्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. पोलिस यंत्रणेला मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाच्या आसपास ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांकडूनही याबाबतची माहिती घेतली जात आहे. शनिवारी (ता.०३ ) रोजी रात्रीच्या सुमारास पाच ते सहा जण सरोवर परिसरात मद्यपान करताना दिसले होते. त्यानंतर काही वेळात मोठा गोंधळ झाला होता. याच दरम्यान काही तरी गंभीर प्रकार घडलाची चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, सोमवार (दि.5) रोजी देखील सातूपर परिसरात 45 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला असून किरकोळ वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. पोलीसांकडून पुढील तपास सुरु असल्याचे समजते.