

नाशिक : पंचवटी येथील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी दिलीप सुनील वीर याला अटक करण्यात आली. आता या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या १३ झाली असून, अजूनही ९ आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
सराईत गुन्हेगार सागर विठ्ठल जाधव याच्यावर दि. १७ सप्टेंबर रोजी पहाटे राहुलवाडी (फुलेनगर) येथे गोळीबार करण्यात आला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विकास उर्फ विकी विनोद वाघ, विकी उत्तम वाघ, अमोल पारे उर्फ बबल्या हे अजूनही फरार आहे. फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलिस शिपाई नितीन पवार यांना या घटनेतील संशयित दीपक सुनील वीर हा मखमलाबादला येणार असल्याची माहिती मिळाली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणांमध्ये माजी नगरसेवक जगदीश पाटील व यामध्ये अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सध्या मध्यवर्ती कारागृहात आहे. पोलिस निरीक्षक सुनील पवार या घटनेचा तपास करीत आहेत.