

सातपूर (नाशिक) : सातपूर औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या संतोषीमाता नगरमध्ये सततच्या घरगुती वादातून सख्या भावाने आपल्या लहान भावाचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची घटना बुधवारी (दि. ११) उघडकीस आली. करण शिंगाडे (३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताचा मोठा भाऊ संशयित अर्जुन शिंगाडे याला अवघ्या काही तासांत अटक केली.
संतोषीमाता नगर परिसरात राहणाऱ्या शिंगाडे कुटुंबातील करण आणि अर्जुन या दोन भावांमध्ये वैयक्तिक कारणांवरून सतत वाद होत हाेते. बुधवारीही दुपारी असाच वाद उफाळून आला आणि काही वेळातच त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्याभरात संशयित अर्जुनने लहान भाऊ करणवर धारदार शस्त्राने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या करणला शेजाऱ्यांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजीत नलावडे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विश्वास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि माहितीच्या आधारे काही तासांतच संशयित अर्जुन शिंगाडेला ताब्यात घेतले. उपनिरीक्षक न्याहालदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय जगताप, पोलिस कॉन्स्टेबल राकेश रसाळ, सागर गुंजाळ आदींनी संयुक्तपणे तपास करत संशयिताला अटक केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजीत नलावडे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विश्वास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि माहितीच्या आधारे काही तासांतच संशयित अर्जुन शिंगाडेला ताब्यात घेतले. उपनिरीक्षक न्याहालदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय जगताप, पोलिस कॉन्स्टेबल राकेश रसाळ, सागर गुंजाळ आदींनी संयुक्तपणे तपास करत संशयिताला अटक केली.