

नाशिक (जानोरी) : दिंडोरी तालुक्यात गणेशगाव येथील युवकाचा खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत असे की, दिंडोरी तालुक्यातील नानशी येथील खुनाची घटना ताजी असतानाच मंगळवार (दि.7) रोजी गणेशगाव येथील शेतकरी युवक ज्ञानेश्वर उत्तम पिंगळ (40) याचा अज्ञात इसमाने खून करून शेतातील घरासमोरील चाळीत रात्रीच्या वेळेस मृतदेह टाकून दिला आहे. घटनास्थळी दिंडोरी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करून दिंडोरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.