

सिन्नर : तालुक्यातील दातली येथे जुन्या वाद उफाळून झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (दि.14) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास घडली. सागर मारुती भाबड (35) असे मृताचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून दातली येथील दोन गटात धुसफूस सुरू होती. त्यातच जुना वाद उफाळला. दोन्ही बाजूच्या 25 ते 30 जणांमध्ये धारदार शस्त्रांनी तुंबळ हाणामारी झाली. पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यात अक्षय म्हाळू भाबड (28), सुयोग म्हाळू भाबड (22), म्हाळू नरहरी भाबड (53), ओमकार विजय डोमाडे (21), जगन्नाथ नरहरी भाबड (50) यांचा समावेश आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. रात्री उशिरा फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सागर भाबड याचे वडील मारुती यांनी मेंढी येथे व्यसनमुक्ती केंद्रात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.