Nashik Drug Seized : नाशिकरोडला घरात पावणेदोन लाखांचे एमडी हस्तगत
नाशिकरोड : जय भवानी रोड परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांचा एमडीचा साठा हस्तगत केला. या प्रकरणी एकाला अटक करत चौघांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
घरातच सापडला 1 लाख 70 हजार रुपयांचा एमडीचा साठा
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सुकदेव सोनवणे (३९, रा. मराठा निवास, जय भवानी रोड, फर्नांडिसवाडी) याच्याकडे एमडी पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत ३४ ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख ७० हजार रुपयांचे एमडी सापडले. पोलिसांनी ते जप्त करत त्याला अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने हे अमली पदार्थ स्टेफन भाई (रा. वाशी) व रोहित नेहे (रा. विहितगाव) व त्याचा मित्र कैफ पठाण (रा. सिन्नर फाटा) यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिस हवालदार बळवंत गोविंद कोल्हे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध एमडी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक वायकर अधिक तपास करीत आहेत.

