

नाशिक : गंगापूर रोडवरील जेहान सर्कल येथील वाइन शॉपवर दगडफेक करून नुकसान करणाऱ्या आणि खंडणी उकळणाऱ्या दोघांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. ११) घडला असून, संबंधितांनी शॉपचालक व रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण केला होता.
प्रणिल ठाकरे (३१, मखमलाबाद नाका) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या दुकानावर बुधवारी मध्यरात्री शिवाजी ऊर्फ बाळा गांगुर्डे (२८, रा. सावरकरनगर, गंगापूर रोड) व राजू माळी (३०, रा. चांदशी) यांनी दगडफेक केली. या घटनेत सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागून जीवित व मालमत्तेला धोका निर्माण झाला. याआधीही संशयितांनी दुकानात शिरून मालकासह कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत ४० हजारांची खंडणी घेतल्याची तक्रार आहे. दोघेही संशयित वारंवार दमदाटी व फुकट मद्याची मागणी करीत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात दोघांनाही अटक केली