Nashik Crime |अंत्यविधीला गेले अन् चोरट्यांकडून लाखोंची घरफोडी

Burglary | दिंडोरी रोडवर दिवसा पावणेसात लाखाेंची घरफोडी
Burglary
घरफोडी Pudhari file photo
Published on
Updated on

पंचवटी : दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनीमागील गायत्रीनगरात स्वस्तिक बंगल्यातील घरातील सर्व सदस्य अंत्यविधीला बाहेरगावी गेलेले असल्याने बंगल्याचे लॉक तोडून सुमारे ६ लाख ७१ हजार रुपयांची घरफोडी झाल्याचा प्रकार घडला. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गौरव लक्ष्मण बोंबले (३३) यांचे इंजिनिअरिंग वर्कशॉप असून, दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनीतील गायत्रीनगर येथे स्वस्तिक नावाचा बंगला आहे. गौरव बोंबले हे वडिलांच्या मित्राच्या अंत्यविधीसाठी रविवारी (दि.२०) सकाळी नऊ वाजता धुळे येथे सर्व कुटुंबीयांसह गेलेले होते. रात्री साडेआठच्या सुमारास शेजारी राहणारे प्रशांत हिरे त्यांना फोन करून तुमच्या घराचा दरवाजा उघड दिसत आहे. घरातील लाइट चालू असल्याचे सांगितले. त्यावर बोंबले यांनी घरीच पोहचत असल्याची माहिती दिली. रात्री साडेअकराला बोंबले घरी पोहोचले असता घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडलेले, तर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. बेडरूममधील सोन्याचे दागिने, त्यांच्या पावत्या व रोख रक्कम चोरी झाल्याचे आढळूले. पोलिस उपनिरीक्षक दीपक पटारे पोलिस पुढील तपास करत आहेत.

चोरीस गेलेले साहित्य असे...

सव्वातीन लाखांचा ४५ ग्रॅमचा पोहेहार, पावणेदोन लाखाची ३५ ग्रॅमची सोन्याची पोत, वीस हजारांची ५ ग्रॅमची सोन्याची ठुशी, साठ हजारांचे ५ ग्रॅमचे कानातले टॉप्स, १९ हजारांचे ३ ग्रॅमचे मंगळसूत्र, १९ हजारांचे ३ ग्रॅमचे डोरले, ३७ हजारांचे ५ ग्रॅमचे ४ अंगठया व २ ओम पान, पाच हजारांचे तोळबंद, २४ हजारांची रोख रक्कम

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news