Nashik Crime | नाशिकमध्ये 13 अवैध सावकारांवर छापे

रोकड, पैसे मोजण्याच्या मशीन्स, डायऱ्या, खरेदीखत, चेकबुक घेतले ताब्यात
Nashik Moneylender Special Report
नाशिकमध्ये 13 अवैध सावकारांवर छापेPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : शहरातील माजी नगरसेवक नैया खैरे, कैलास मुदलियार यांच्यासह शहरातील १३ अवैध सावकारांवर छापे टाकत पोलिसांनी घरझडती घेतली. झडतीत रोकड, पैसे मोजण्याच्या मशीन्स, डायऱ्या, चेकबुक, खरेदीखत, साठेखत आदी साहित्य मिळून आले.

Summary

अवैध सावकार - हस्तगत मुद्देमाल

  • नैया खैरे - १२ करारनामे, १९ धनादेश, २१.५ लाख रोख.

  • संजय शिंदे - ८१ कोरे धनादेश, ४० खरेदी खत, ६ लेजर बुक, ४ डायऱ्या, तीन लाख २० हजार पाचशे रुपयांची रोकड.

  • प्रकाश अहिरे - २३ नोंदणीकृत कागदपत्रे, चार लाख ५० हजार रोख, ८८ अमेरिकन डॉलर (भारतीय मूल्य सात लाख ५० हजार)

  • सुनील पिंपळे - दोन घरे, तीन दुकाने, ११ खरेदीखत, दोन साठे खत, एक कब्जा पावती, पाच कोरे स्टॅम्प पेपर, २४ कोरे धनादेश, दोन हात उसनवार पावत्या, चार लाख आठ हजार रुपये रोख.

  • गोकुळ धाडा - ५० उसनवार पावत्या, दोन खरेदी खत, ७० कोरे धनादेश.

  • धनु लोखंडे - ५० खरेदी खत व १२ कोरे धनादेश.

  • राजेंद्र जाधव - दोन डायऱ्या व दोन लाख तीन हजार ३५० रुपये रोख.

  • कैलास मैंद - दोन कोरे धनादेश, एक ओमओयू, ९ खरेदीखत.

मागील काही दिवसांपासून शहरात अवैध सावकारीने उच्छांद मांडला असून, त्यास अनेकजण बळी पडत आहेत. नाशिक पोलिसांनी नुकतीच वैभव देवरे या सावकाराविरुद्ध मोक्का अन्वये कारवाई करीत, अवैध सावकारांना इशारा दिला होता. आता या कारवाईमुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत. अवैध सावकार वैभव देवरे याचे कारनामे समोर येत नाहीत, तोच रोहित कुंडलवाल या अवैध सावकाराला अनेकजण बळी पडल्याचे समोर आले. तसेच शहरात आणखीनही बरेच अवैध सावकार नागरिकांची पिळवणूक करीत असल्याने पोलिसांनी शनिवारी (दि.५) धडक कारवाई करीत अवैध सावकारांची घरझडती घेतली. या घरझडतीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, डॉ. अंचल मुदगल, जितेंद्र सपकाळे, रणजित नलावडे, श्रीमनवार, अशोक गिरी, जगवेंद्र राजपूत, पवार, सचिन खैरनार, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, हेमंत तोडकर आदींच्या पथकाने जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी आदेशित केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत तब्बल 13 अवैध सावकारांच्या घरांची झडती घेतली. यात राजकीय पुढाऱ्यांची संख्या अधिक असून, त्यांच्या घरातून अनेक धक्कादायक कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

१३ पैकी आठ सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तर संशयित गुरुदेव कांदे, जुबेर पठाण, कैलास मुदलियार, सचिन मोरे, रोहित चांडोळे यांच्या राहत्या घरात अवैध सावकारी व्यवसायाशी संबंधित कोणताही पुरावा मिळून आला नसल्याने, त्यांच्यावर कारवाई केली गेली नसल्याने पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, या कारवाईमुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले असून, यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

राजकारणीच अवैध सावकार

देवरे याच्यासह कुंडलवाल या अवैध सावकाराचे कारनामे समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. गुंडगिरीचा कळस गाठत या सावकारांनी नागरिकांचा छळ केला. त्यातील कुंडलवाल हा भाजपचा पदाधिकारी असल्याचे पुढे आले. शनिवारी (दि.५) पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीत देखील बहुतांश अवैध सावकार हे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्यातील नैया खैरे हे माजी नगरसेवक आहेत. जनतेचे नेतृत्व करणारेच जनतेची पिळवणूक करीत असल्याची चर्चा या कारवाईनंतर शहरात रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news