Nashik Crime News | बालिकेचे अश्लील फोटो व्हायरल; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा

छत्रपती संभाजीनगर भागात राहणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
 Crime news
Crime news File Photo
Published on
Updated on

नाशिक : तेरावर्षीय बालिकेचे अश्लील फोटो मिळवून तिच्या नातलगांना व्हायरल क धक्कादायक घटना समोर आली. शेजारी राहणाऱ्या 17 ते 18 वयोगटातील संशयिताने हा प्रकार केला असून, याबाबत नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात छत्रपती संभाजीनगर भागात राहणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेरा वर्षांची पीडिता ही कुटुंबासह छत्रपती संभाजीनगर भागात वास्तव्यास हाेती. तेव्हा संशयित मुलाने तिच्या शेजारी राहण्याचा फायदा घेऊन ओळख वाढविली. त्यानंतर, तिच्याशी ऑनलाइन साेशल मीडियासह स्नॅपचॅटचा वापर करून चॅटिंग सुरू केले. त्यातच तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन गाेडीगुलाबीने तिचे अश्लील फाेटाे ताब्यात घेतले. हा सर्व प्रकार डिसेंबर २०२४ ते २३ मे २०२५ पर्यंत सुरू हाेता. त्यातच, पीडित मुलीने अचानक संशयिताशी चॅटिंग करणे थांबविले. त्याचा राग आल्याने त्याने तिचे अश्लील फाेटाे पीडितेच्या वडिलांच्या मित्रांना व नातलगांना शेअर करून व्हायरल केले. काही तासांनी हा धक्कादायक प्रकार समाेर आल्यावर पीडितेसह तिच्या कुटुंबाची पायाखालील वाळू सरकली. त्यांनी तत्काळ सायबर पाेलिस ठाणे गाठून संशयिताच्या स्नॅपचॅटवरील आयडीसह अन्य आवश्यक माहिती पाेलिसांना दिली. त्यानुसार, संशयितावर भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम व बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयिताच्या मागावर पथक रवाना

पीडितेचे वडील सरकारी नाेकर असून, त्यांची बदली नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथून नाशिक येथे झाली. त्यामुळे पीडितेसमवेतचा हा प्रकार छत्रपती संभाजीनगर व नाशिक येथे वास्तव्यास असताना घडला असून, संशयिताचे वय १७ ते १८ असण्याचा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे. त्याबाबतची कागदपत्रे पडताळली जात असून, संशयिताला पकडण्यासाठी सायबर पथक छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news