

नाशिक : क्रिप्टो करन्सीत आर्थिक गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमीष दाखवून भामट्यांनी ३३ वर्षीय युवकास ७५ लाख ९५ हजार रुपयांचा गंडा घातला.
याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात युवकासोबत संपर्क साधणाऱ्यांसह ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्या खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भामट्यांनी २२ ऑक्टोबर २०२४ ते २० मार्च २०२५ या कालावधीत गंडा घातला. फेसबुकवरून भामट्याने तरुणासाेबत संपर्क साधला. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर सहभागी करीत चांगल्या परताव्याचे आमीष दाखवले. त्यानुसार तरुणाने वेळोवेळी पैसे भरले. मात्र, परतावा किंवा गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलिस तपास करीत आहेत.