Nashik Crime | आर्थिक कारणातून केला गर्भवतीचा खून; जन्मठेपेची शिक्षा

गर्भवतीचा खून करणाऱ्यास जन्मठेप
Nagar News
खुनाच्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली pudhari
Published on
Updated on

नाशिक : आर्थिक कारणातून गर्भवतीचा खून करणाऱ्यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर आरोपीस मदत करणाऱ्यास तीन वर्षे सक्तमजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अश्वमेघ नगर ते घाडगे मळा परिसरादरम्यान, १९ जानेवारी २०२१ रोजी पूजा विनोद आखाडे (२३, रा. मोरे मळा, पंचवटी) या महिलेचा खून झाला होता.

पूजा आखाडे हिने आरोपी सागर दिलीप भास्कर (२९, रा. मोरे मळा, पंचवटी) यास उसने पैसे दिले होते. घटनेच्या रात्री ११.५० वाजेच्या सुमारास पूजाने आदेशकडे पैशांची मागणी केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले. या वादातून आदेशने पूजावर धारदार शस्त्राने वार केले. पूजा गर्भवती असल्याचे माहिती असतानाही आदेशने तिच्या पोटात वार केला. गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्र आदेशने त्याचा साथीदार विलास प्रकाश खरात (२७, रा. म्हसोबावाडी, पंचवटी) यास दिले. विलासने हे हत्यार धुवून पुरावा नष्ट करीत आदेशला मदत केली. त्यामुळे पोलिसांनी तपास करीत दोघांना अटक केली होती. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा शाबित झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश मलकापट्टी रेड्डी यांनी आदेश यास जन्मठेप आणि १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तर विलास खरात यास तीन वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news