

नाशिक : अल्पवयीन मुलाला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना नारायण बापूनगर येथे घडली. यासंदर्भात निबोध सचिन जाधव (रा. मंगलमूर्तिनगर) याने फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सुमित उर्फ सोनू गायकवाड, आर्यन उर्फ लकी गवारे, अनिकेत विटकर, प्रथमेश केदारे, वैभव जाधव व ओजस सुकेणकर यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्नचा गुन्हा उपनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. हॉटेल रेड स्टील नारायण बापूनगरमागे फिर्यादी बसलेला असताना त्याच्यावर आरोपींनी हल्ला केला. फिर्यादीच्या छातीच्या डाव्या बाजूला चाकू खुपसून गंभीर दुखापत करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. आरोपींविरोधात फिर्यादीने तक्रार दिल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक हरिसिंग पावरा अधिक तपास करीत आहेत.