

वावी (सिन्नर, नाशिक) : छुप्या पद्धतीने नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाने अवैद्य रित्या गोमांस वाहतूक करणाऱ्या टोयोटा कंपनीच्या कारचा सिन्नर तालुक्यातील सायाळे शिवारात अपघात झाल्याने सदर गोमांस तस्करीचा प्रकार उघडीस आला आहे.
भल्या पहाटे छुप्या पद्धतीने समृद्धी महामार्गाने वैजापूर वरून मुंबईकडे जाणाऱ्या टोयोटा कंपनीचे वाहन (क्रमांक एम एच 03 ए एफ 0463) या वाहनात अंदाजे सात ते आठ क्विंटल प्राण्यांच्या तस्करीचे मांस आढळून आले. अपघात ग्रस्त कार सुसाट वेगाने जात असताना सायाळे शिवारात मंगळवार (दि.8) रोजी सकाळी 6.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाला पाठी मागून जोराची धडक दिल्याने सदर अपघात घडला.
मात्र, ज्या वाहनावर जाऊन गोमा सिलेब भरलेले वाहन आदळले ते वाहन येथून मात्र फरार झाले आहे. टोयोटा कार चालक इरफान शेख (वय 25] राहणार नवरंग सिनेमा, अंधेरी, मुंबई) यास पोलिसांनी अटक केली आहे. अपघात ग्रस्त गोमांस वाहनामध्ये प्लॅस्टिकच्या बॅगांमध्ये खचाखच भरलेले मांस वाहनाच्या फ्रंट शिटवर व मागच्या डिक्कीत आढळून आले. महामार्गावरील वाहतूक नियंत्रण कक्ष अधिकारी मिलिंद सरवदे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी वावी पोलिसांना संपर्क साधला. वावी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अवैध गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनास ताब्यात घेऊन चालकास अटक केली आहे तर फरार वाहनाचा सीसीटीव्ही द्वारे शोध सुरु आहे.